पाचोरा :- येथील पोलीस स्टेशन हद्दीत दोन दिवसांपूर्वी गावठी कट्टा व जिवंत : काडतुसासह तालुक्यातील गोराडखेडा येथील एका तरुणास पकडल्यानंतर पाचोरा पोलिसांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा तालुक्यातील पुनगाव येथील दोन तरुणांकडून २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
या कारवाईने अवैधरीत्या गावठी कट्टा बाळगणाऱ्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. या घटनेत पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथील राहुल अनिल परदेशी (२७) व रामचंद्र गोपीचंद परदेशी (३४) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. २० सप्टेंबर २०२३ रोजी रात्री २३.३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेबाबत पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना पुनगावातील दोघा संशयितांकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस पथकाला कारवाईचे निर्देश दिले.
पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुरेश पाटील, पोलीस हवालदार विश्वास देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल संदीप भोई, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे आदींच्या पथकाने महादेव मंदिराजवळील पोल्ट्री फार्मजवळ संशयीत येताच त्यांना गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ आढळलेला २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला. पोलीस कर्मचारी प्रकाश शिवदे यांच्या फिर्यादीवरून दोघे संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघा आरोपींना गुरुवारी पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींची जळगाव सबजेलला रवानगी करण्यात आली आहे.. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम