निंभोरा प्रतिनिधि:- परमानंद शेलोडे
रावेर :- दसनुर येथील चंद्रकांत शांतीनाथ संगपाळ ,सूर्यकांत संगपाळ,प्रकाश शांतीनाथ संगपाळ हे तिघे भाऊ पुजनाच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम करतात यांच्या घरी पिढ्यानपिढ्या जेष्ठागौरी आगमन व व पूजन केले जाते पंचक्रोशीतील लोक दर्शनाचा लाभ घेतात
जेष्ठा गौरीचे परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दुध आणि कोमट पाण्याने धुतले जातात आणि त्यांचा पायावर कुंकाने स्वस्तिक काढलं जातं. घराच्या दारापासून लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवतात. घरात येताना पावलांवरुन गौरींचे मुखवटे आणतात. शंख वाजवून गौरीचं घरात आगमन केलं जातं. लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी… असे म्हणज गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यानं संपूर्ण घरात मिरवत घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा व इतर गोष्टी दाखविण्याची प्रथा असते. मग देवघरासमोर लक्ष्मीची आगमन करुन घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होवो, सुख- समृध्दी येवो अशी प्रार्थना केली जाते. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवतात.
अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. तीन दिवस साजरा केल्या जाणार्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते.
दुसर्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्या दिवशी विसर्जन करतात. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रात महालक्ष्मी म्हणजे गौरीची चित्रे किंवा आपल्या परंपरेनुसार चिन्हे ठेवली जातात. ज्येष्ठ नक्षत्रात महालक्ष्मीची पूजा करुन महानैवेद्य दाखवले जाते. तिसर्या दिवशी ते मूळ नक्षत्रात गौरीचे विसर्जन करण्यात येते. गौरीला महालक्ष्मी ही म्हटलं जाते आणि ज्येष्ठ नक्षत्र म्हणून पूजले जाते म्हणून याला ज्येष्ठा गौरी पूजन असे संबोधले जाते.
पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हटले जाते..
- जळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा,8 जुगारींना अटक, 20 लाख रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त.
- अनेक वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध,प्रेयसी लग्नासाठी पळून आली प्रियकराकडे, पण त्याने दिला धोका अन्…. एक SMS अन् 6 महिन्यांनी अंगावर काटा आणणारी कहाणी.
- धरणगाव तालुक्यात बाबाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू,सर्व नातेवाईक जमले,अचानक ‘तेच वृद्ध’ घरी परतल्याने कुटुंबीयांसह नातेवाईकही थक्क.
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.