Viral Video : माणसाच्या आयु्ष्यात शाळा हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो. शाळेच्या आठवणी आयुष्यभर स्मरणात राहतात. शाळेतील मित्र, मैत्रिणी, शिक्षकांबरोबर घालवलेले क्षण कायम लक्षात राहतात.
सध्या सोशल मीडियावर असाच एक शाळेतील व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत एक विद्यार्थी ‘तुझमे रब दिखता है…’ या गाण्यावर शिक्षकांसह डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही तुमच्या शिक्षकांची किंवा शाळेची आठवण येऊ शकते.
हा व्हायरल व्हिडीओ शाळेच्या एका वर्गखोलीतील आहे. एका बाजूला बाकांवर शिक्षिका बसलेल्या आहेत, तर आजूबाजूच्या बाकांवर विद्यार्थी बसलेले आहेत. व्हिडीओमध्ये पुढे दिसेल की एक विद्यार्थी ‘तुझमे रब दिखता है…’ गाण्यावर सुंदर डान्स करत आहे.
डान्स करताना मध्ये मध्ये तो सर्व शिक्षकांच्या पाया पडतो. पुढे एका शिक्षिकेबरोबर तो डान्ससुद्धा करतो. या विद्यार्थ्याचा डान्स पाहून सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षिका टाळ्या वाजवताना व्हिडीओत दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेच्या दिवसांची आठवण येऊ शकते.
हा व्हिडीओ ajaysingh2.4 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘ते पण काय दिवस होते.’
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, ‘शालेय जीवन आयुष्यातील सर्वात चांगला काळ असतो. ते दिवस कधीही परत येत नाही’, तर एका युजरने लिहिलेय, ‘खूप छान डान्स केला.’ आणखी एका युजरने लिहिलेय, ‘व्हिडीओ पाहून मला माझ्या शाळेतील शिक्षकांची आठवण आली.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






