5 Health and Nutrition Benefits of Chickpeas and Peanuts : सकाळी खा चणे-शेंगदाणे, ३० दिवस फॉलो करून पाहा, वजन होईल कमी-हृदयही राहील निरोगी
चणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. चणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते, यासह प्रोटीनचे एक उत्तम स्त्रोत म्हणून ओळखले जाते. लोक याचे सेवन अनेक प्रकारे करतात. बहुतांश लोकं चणे भिजवून किंवा उकडून खातात. चण्यासोबत आपण शेंगदाणे देखील खाऊ शकता. शेंगदाण्यांमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. ३० दिवस नियमित मुठभर चणे – शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत.
पचन सुधारण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत चणे-शेंगदाणे खाऊन आपण हेल्दी राहू शकता. चणे-शेंगदाणे नक्की कोणत्या पद्धतीने खायला हवे? चणे-शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात? यासंदर्भातली माहिती लखनौस्थित बलरामपूर हॉस्पिटलचे आयुर्वेदाचार्य डॉ जितेंद्र शर्मा यांनी दिली आहे
चणे-शेंगदाणे खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

गरोदरपणात फायदेशीर
गरोदरपणात चणे-शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. चणे-शेंगदाणे खाल्ल्याने बाळाचा विकास उत्तम होतो. शेंगदाणे ओमेगा ६ फॅटी ऍसिडचा उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामुळे त्वचेला कोमलता आणि ओलावा मिळतो.
पचनक्रिया सुधारते
चणे -शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला अनेक समस्यांपासून सुटका मिळते. विशेषत: बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामध्ये आढळणारे फायबर पचन प्रक्रियेसाठी फायदेशीर ठरते. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
हाडं मजबूत होतात
चणे-शेंगदाणे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे उत्तम स्त्रोत आहे. जे हाडांची ताकद वाढवण्यासाठी प्रभावी ठरते. ३० दिवस नियमित चणे-शेंगदाणे खाल्ल्याने हाडं मजबूत होतात.
त्वचा चमकदार करते.
चणे-शेंगदाणे वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. यातील अँटी-ऑक्सिडंटमुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा यांसारखी वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊ लागतात. सकाळी नाश्त्यामध्ये मुठभर भिजवलेले चणे-शेंगदाणे खाल्ल्याने त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.
हृदय निरोगी ठेवते.
हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी नियमित चणे-शेंगदाणे खा. आपण यासाठी भिजवलेले चणे-शेंगदाणे खाऊ शकता. शेंगदाण्यांमध्ये कार्डिओप्रोटेक्टिव्ह गुणधर्म आढळतात. कार्डिओप्रोटेक्टिव्ह हा एक असा गुणधर्म आहे, जो हृदयाशी संबंधित आजारांचा धोका अनेक पटीने कमी करतो.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






