संपुर्ण संसार उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांना शासनातर्फे तत्काळ 10 हजार ₹ मदत मिळवून देणार आ.चिमणराव पाटील
एरंडोल :- तालुक्यातील पिंपळकोठा बुद्रुक व खुर्द पिंप्री प्र.चा. व बुद्रुक या चार ही गावांच्या वर चोरटक्की शिवारातील जंगलात ढगफुटीसदृश अतिवृष्टी झाल्यामुळे या चारी गावांचा लगत वाहत असलेल्या नाल्यास महापूर आल्यामुळे गावात पाणी शिरले व अनेक नागरिकांचे घर संसार, जनावरे, कोंबड्या, सायकली, बैलगाडी, शेतीची अवजारे व मोटरसायकली आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले. रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चोरटक्की शिवारातील जंगलात ढगफुटीसदृश अतिवृष्टी झाल्यामुळे दोन्ही पिंपळकोठा यांच्या मध्यभागी वाहत असलेल्या नाल्यास महापूर आला. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे गावातील सर्व नागरिक हे झोपलेले होते. ग्रामीण भाग असल्यामुळे गुरेढोरे जनावरे हे घराजवळच बाहेर बांधलेले होते. नाल्यास महापूर आल्यामुळे बांधलेले गुरे ढोरे वाहून गेले.

नाल्याच्या लगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले मातीची बांधलेली घरे, घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू, अन्नधान्य, कागदपत्रे, रुपये, सायकल, दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेले.पिंपळकोठा बुद्रुक येथे जवळपास 80 नागरिकांची घरे उध्वस्त झाली आहेत, या ठिकाणी 15 बैल, 12 म्हैस, 25 बकऱ्या, 60 कोंबड्या,16 पारडु, 4 सायकल, दोन बैलगाडी व शेती उपयोगी अवजारे एवढे अंदाजित नुकसान या गावात झाले आहे पिंपळकोठा खुर्द येथे जवळपास 15 नागरिकांची घरे उध्वस्त झाली आहेत, 9 बैल,5 म्हैस, 30 बकऱ्या, 70 कोंबड्या,10 पारडु, 3 सायकल,2 दुचाकी तीन बैलगाडी व शेती उपयोगी अवजारे एवढे अंदाजित नुकसान या गावात झाले आहे.पिम्प्री बुद्रुक येथे आठ नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहे या ठिकाणी दोन बैल पाच पाच बकऱ्यातर पिम्प्री प्र.चा. येथे 9 घरे उध्वस्त झाली आहेत तर सहा बैल, तीन म्हशी ,15 कोंबड्या,5 बकऱ्या,3 पारडू एवढे नुकसान झाले आहे. पिम्प्री प्र.चा. येथील सिद्धेश्वर विद्यालय येथे शाळेतील वर्गांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे विद्यालयातील दोन संगणक, शालेय पोषण आहारच्या तीन क्विंटल तांदूळ, डाळ, यामध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे संपूर्ण खराब झाले आहे तर सरपाने पुराच्या पाण्यात वाहून गेले. या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी ठेवलेले 30 सिमेंटच्या गोण्या चार डंपर वाळु व विटा पाण्यात वाहून गेल्यात

पिंपळकोठा बुद्रुक येथे जवळपास 80 नागरिकांची घरे उध्वस्त झाली आहेत, या ठिकाणी 15 बैल, 12 म्हैस, 25 बकऱ्या, 60 कोंबड्या,16 पारडु, 4 सायकल, दोन बैलगाडी व शेती उपयोगी अवजारे एवढे अंदाजित नुकसान या गावात झाले आहे पिंपळकोठा खुर्द येथे जवळपास 15 नागरिकांची घरे उध्वस्त झाली आहेत, 9 बैल,5 म्हैस, 30 बकऱ्या, 70 कोंबड्या,10 पारडु, 3 सायकल,2 दुचाकी तीन बैलगाडी व शेती उपयोगी अवजारे एवढे अंदाजित नुकसान या गावात झाले आहे.
पिम्प्री बुद्रुक येथे आठ नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहे या ठिकाणी दोन बैल पाच पाच बकऱ्या
तर पिम्प्री प्र.चा. येथे 9 घरे उध्वस्त झाली आहेत तर सहा बैल, तीन म्हशी ,15 कोंबड्या,5 बकऱ्या,3 पारडू एवढे नुकसान झाले आहे.
पिम्प्री प्र.चा. येथील सिद्धेश्वर विद्यालय येथे शाळेतील वर्गांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे विद्यालयातील दोन संगणक, शालेय पोषण आहारच्या तीन क्विंटल तांदूळ, डाळ, यामध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे संपूर्ण खराब झाले आहे तर सरपाने पुराच्या पाण्यात वाहून गेले. या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी ठेवलेले 30 सिमेंटच्या गोण्या चार डंपर वाळु व विटा पाण्यात वाहून गेल्यात
काल २३ सप्टेंबर रोजी एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा बु, पिंपळकोठा खु व पिंप्री (माळपिंप्री) येथे ढगफुटी सदृष्य पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली. हे पुराचे पाणी नागरीकांचा घरात, शेतकऱ्यांचा शेतात शिरल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. गोर-गरिब , सर्वसामान्य नागरिकांचे संसार उघड्यावर आले. अनेकांची घरे जमीनदोस्त झाली. मानवी निवाऱ्यासाठीची साहीत्ये पाण्यात पाहुन गेली. अनेक पशुधन धारकांचे पशुधन पुराचा पाण्यात पाहुन गेले, काही पशुधन मृत्यृमुखी पडले. कष्टकरी बळीराजाचा शेतात उभी पिके जमीनदोस्त झाली, शेतकऱ्यांचा घरात साठवलेली शेती पिके वाहुन झाली. या सर्व परिस्थितीची आज आमदार चिमणराव पाटील यांनी पाहणी केली.
पहा व्हिडिओ
यावेळी या पुराचा पाण्यामुळे मानवी जीवन विस्कळीत झाले, बळीराजा मोठ्या आर्थिक अडचणीत आलेला आहे नागरिकांना तातडीची मदत व्हावी यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मा.अनिल पाटील व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.आयुष प्रसाद यांचेशी दुरध्वनीव्दारे चर्चा करून शेतकऱ्यांसह नागरिकांचा घरांचा झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना व्हावेत तसेच सदरचा प्रस्ताव त्वरित शासन दरबारी सादर करण्यात यावा असे सुचित केले. तसेच नुकसानग्रस्तांना सर्वोतोपरी मदत व सहकार्य करण्याचे ठोस आश्वासन आमदार चिमणराव पाटील यांनी दिले. तसेच स्थानिक प्रशासनाला देखील कुठलाही हलगर्जीपणा न करता प्रामाणिकपणे कोणावरही अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातुन शासकीय कामकाज करण्याचे आदेश आमदार चिमणराव पाटील यांनी दिले.

यावेळी उपविभागीय अधिकारी मनिष गायकवाड, तहसिलदार सुचिता चव्हाण, गटविकासअधिकारी दादाजी जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी, कृषि सहाय्यक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सर्व शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र चौधरी, धरणगांव बाजार समितीचे मा.सभापती शालिकभाऊ गायकवाड, एरंडोल शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत), मा.तालुकाप्रमुख बबलु पाटील, भाजपाचे मा.तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील, तालुकासंघटक संभाजी पाटील, शहरसंघटक मयुर महाजन, मा.नगरसेवक संजय चौधरी, छोटु मराठे, महेंद्र पाटील यांचेसह स्थानिक गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासोचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोट:- आ चिमणराव पाटील
पुराच्या पाण्यामुळे ज्या नागरिकांचा संसार पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे अशा नागरिकांना शासनातर्फे तात्काळ दहा हजार रुपये मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितल्यामुळे तात्काळ देण्यात येईल असे आमदार चिमणराव पाटील पाटील यांनी सांगितले
सोमवार सकाळपासूनच नुकसान झालेल्या सर्व नागरिकांचे पंचनामा करण्याचे आदेश तलाठी व कोतवाल यांना देण्यात आले आहे. प्राथमिकता हा ज्यांच्या घराचे व सामानाचे नुकसान झाले आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तहसीलदार सुचिता चव्हाण.
ज्या नागरिकांचे घरे पूर्णपणे वाहून गेले असतील अशा नागरिकांना शबरी घरकुल योजनेत, रमाई घरकुल योजनेत त्यांचे नाव समाविष्ट करून त्यांना नवीन घरकुले बांधण्याच्या प्रस्ताव दाखल करण्यात येईल दादाजी चव्हाण गटविकास अधिकारी एरंडोल






