कामावर जाण्यासाठी आई बाहेर पडताच अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार; पत्नीने केला नराधम…….. विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

Spread the love

नाशिक – कॅनल रोडवरील आम्रपाली नगर भागात पत्नी घरात नसल्याची संधी साधत पतीने वारंवार अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. संशयीताचा अतिरेक वाढल्याने मुलीने अपबिती महिलेकडे कथन केल्याने तिने आपल्या पतीविरोधात पोलिसात धाव घेतली असून, याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल लक्ष्मण हिरे (२७) असे संशयीताचे नाव आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती खासगी नोकरी करते. संशयीत व तक्रारदार या दांम्पत्याकडे अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. महिला नोकरी निमित्त घराबाहेर पडताच संशयिताने घरात कुणी नसल्याची संधी साधत हे कृत्य केले.

१२ ते २० सप्टेंबर दरम्यान रात्रीच्या वेळी आापल्या नोकरीवर गेली असता संशयीताने मुलीच्या असाह्यतेचा लाभ उठवित तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. संशयिताचा रोजचा अतिरेक वाढल्याने मुलीने हा प्रकार महिलेकडे कथन केल्याने तिने पतीविरोधात पोलिसात धाव घेतली असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक दुकळे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार