सोयगाव तालुक्यात पाच तास संततधार-अकरा गावांवर ढगफुटी सदृश पाऊस अकरा गावात पिकांसह शेती उध्वस्त

Spread the love

सोयगाव :- सोयगाव सह तालुक्यात शनिवारी रात्री एक वाजता सुरू झालेला पाऊस सलग पाच तास संततधार झाला त्यामुळे खरिपाच्या पिकांचें मोठे नुकसान झाले आहे तालुका प्रशासनाने सोयगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने २१ हजार ३७८ हेक्टरवर तडाखा बसल्या चा प्राथमिक अहवाल आपत्ती निवारण विभागला रविवारी सायंकाळी पाठविला आहे दरम्यान या संततधार पावसा सोबत घोसला सह अकरा गावांवर ढगफुटी चा पाऊस झाल्याने या अकरा गावातील तीनशे ८७ हेक्टरवर शेती पिकांसह वाहून गेल्याने या अकरा गावात शेतीच उध्वस्त झाली आहे

सोयगाव सह तालुक्यात शनिवारी रात्री एक वाजता सुरू झालेला संततधार पाऊस रविवारी पहाटे सहा वाजेपर्यंत सुरू होता दरम्यान सोयगाव मंडळात केवळ रिपरीप ची संततधार तर तिखी ,उमरविहिरे, निमखेडी, घोसला, नांदगाव, नांदगाव तांडा ,तिडका बोरमाळ तांडा वाकडी पहुरी जंगली कोठा या अकरा गावांवर पाच तास ढगफुटी चा पाऊस झाला आहे त्यामुळे या अकरा गावातील कपाशी मका सोयाबीन सह शेती वाहून गेली असून

घोसला गावाच्या लागत असलेल्या खटकाली नदीच्या पात्राचा पूर शेती शिवारात शिरल्याने साठ ते सत्तर शेतकऱ्यांची दोनशे दहा एकरवरील शेती पिकांसह वाहून गेली तर नदीच्या पात्रा चे पाणी शेती शिवारात शिरल्याने शेतीची नाला झाल्या चे घोसला शिवारात चित्र आहे यामध्ये नदी पात्राच्या काठाशी असलेल्या धोंडू युवरे यांचे तीन एकर पवित्रा बाई युवरे यांचे दोन एकर सिंधु बाई युवरे दोन एकर संजय सोनार तीन एकर याप्रमाणे सर्वाधिक शेती पुराच्या पाण्यात वाहून गेल्या मुळे नुकसान झाले आहे

दरम्यान तिखी शिवारातील नाल्याच्या पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे मशीद खा पठाण ,शेख मुसा शेख करीम यांचे सह दहा शेतकऱ्यांची शेती नाल्याच्या पुरात वाहून गेली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रु चे नुकसान झाले असून तालुका प्रशासनाने प्राथमिक नुकसानी चा अंदाज जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे….

हे पण वाचा

टीम झुंजार