तुम्ही घरी गेल्यावर एक काका येतात. त्यांनी एकदा गालावर किस केलं आणि मारुन टाकेन म्हणाले, अशी तक्रार मुलीनं तिच्या वडिलांकडे केली. त्यानंतर वडिलांनी एक प्लान आखला.
लखनऊ: पतीची पाठ वळताच प्रियकराला घरी बोलावणाऱ्या पत्नीला पतीनं रंगेहात पकडलं. पत्नी आणि प्रियकरला आक्षेपार्ह अवस्थेत पकडणाऱ्या डॉक्टर पतीनं दोघांना जन्माची अद्दल घडवली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक करुन त्याची रवानगी कोठडीत केली आहे. डॉक्टरांच्या लहान लेकीमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. घटना उत्तर प्रदेशमधील कानपूरची आहे.
विवाहबाह्य संबंध ठेवणारी महिला पेशानं शिक्षिका आहे. तिला दोन मुलं आहेत. मोठा मुलगा १५ वर्षांचा असून धाकटी लेक ६ वर्षांची आहे. महिलेचा पती डॉक्टर आहे. फतेहपूरमधील रुग्णालयात तो काम करतो. पती आणि मुलगा घरी नसल्यावर महिला तिच्या प्रियकराला बोलवायची. तो पेशानं प्रॉपटी डीलर आहे. गेल्या काही महिन्यांपासून महिलेचे विवाहबाह्य संबंध बिनदिक्कत सुरू होते.
महिला आणि तिचा प्रियकर घरात लहान मुलीसमोर अश्लिल चाळे करायचे. मुलीनं ही गोष्ट वडिलांना सांगितली. ‘तुम्ही घरी नसताना एक काका येतात. ते आईला घेऊन खोलीत जातात. एकदा त्यांनी माझ्या गालावर किस केलं. कोणाला काही सांगितलंस तर मारुन टाकेन, असं म्हणाले,’ अशा शब्दांत मुलीनं झालेला प्रकार वडिलांना सांगितला. लेकीनं सांगितलेला प्रकार पाहून डॉक्टरांनी दोघांना रंगेहात पकडण्याची योजना आखली. बुधवारी ते घरातून बाहेर पडले. रुग्णालयात जात असल्याचं त्यांनी पत्नीला सांगितलं. पण ते अर्ध्या वाटेतून घरी परतले. त्यावेळी पत्नी तिच्या प्रॉपर्टी डीलर प्रियकरासोबत खोलीत होती. पतीनं गुपचूप खोलीची कडी लावली आणि कुलूप लावलं. यानंतर त्यानं पोलिसांना फोन केला. डॉक्टरांच्या तक्रारीवरुन पोलीस आले. त्यांनी प्रियकराला अटक केली.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






