शालेय विद्यार्थी झाले आक्रमक; एस टी बस थांबत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी केले रस्ता रोको आंदोलन.

Spread the love

यावल : तालुक्यातील चितोडा येथे विद्यार्थ्यांसाठी बस थांबवली नाही म्हणून विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. घटनास्थळी तातडीने पोलीस निरीक्षक व एसटी आगारातील वाहतूक नियंत्रक यांनी धाव घेतली व विद्यार्थ्यांची समजूत काढून यापुढे नेहमी तेथे बस थांबतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

चितोडा ता. यावल येथील बस स्थानकावर सकाळी नऊ वाजेपासून गावातील विद्यार्थी यावल येथे येण्या करीता थांबले होते. दरम्यान एक तासात येथून तीन एसटी बसेस गेल्या मात्र, चालकांनी बस थांबवली नाही म्हणून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. दरम्यान रस्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, यावल एसटी आगाराचे वाहतूक निरीक्षक कुंदन वानखेडे हे पथकासह चितोडा येथे दाखल झाले व त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली.

यावल आगारातील तब्बल १६ एसटी बसेस गणेशोत्सव निमित्त कोकणात गेल्या आहेत म्हणून फैजपुर मार्गावरील काही फेऱ्या रद्द आहेत परिणामी ही अडचण निर्माण झाल्याचे सांगितले तसेच चोपडा एसटी आगारातील दोन बसेस इथून गेल्या त्या का थांबल्या नाही याबाबत आपण संबंधितांना विचारणा करू व यापुढे नियमित येथे बस थांबतील असे आश्वासन देण्यात आले तेव्हा आश्वासनानंतर आंदोलन घेण्यात आले.

हे पण वाचा

टीम झुंजार