पाचोरा :- तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ‘सामाजिकशास्त्र संशोधनात माहितीचे वर्गीकरण कसे करावे ?’ या विषयावरील या कार्यशाळेमध्ये डॉ. सतीश पारधी, (अर्थशास्त्र विभागप्रमुख, कला महाविद्यालय, मारवड) तसेच डॉ. जनार्दन देवरे (अर्थशास्त्र विभाग, सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव) हे संसाधन व्यक्ती म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड होते.

प्रथम सत्रात डॉ. जनार्दन देवरे यांनी तथ्य संकलन म्हणजे काय, तथ्य संकलनाचे स्त्रोत, त्याचे प्रकार, तथ्यांचे वर्गीकरण कसे करावे, सारणीयन, आलेख, आकृत्या कशा काढाव्यात याचे विवेचन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्राच्या डॉ. सतीश पारधी यांनी संशोधनातील गृहीतके, संदर्भ ग्रंथ, संदर्भसूची यांची निवड कशी करावी, विविध सामाजिक प्रश्नांविषयी संशोधनासाठी विषय कसे निवडावेत, याचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड हे अध्यक्षस्थानी होते तर डॉ.एस. डी. भैसे (समन्वयक, कला व वाणिज्य शाखा), प्रा. एस.ए. कोळी, प्रा. इंदिरा लोखंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. भालेराव यांनी तर आभार प्रा. प्रवीण देसले यांनी केले. कार्यशाळेला बहुसंख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
हे पण वाचा
- जळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा,8 जुगारींना अटक, 20 लाख रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त.
- अनेक वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध,प्रेयसी लग्नासाठी पळून आली प्रियकराकडे, पण त्याने दिला धोका अन्…. एक SMS अन् 6 महिन्यांनी अंगावर काटा आणणारी कहाणी.
- धरणगाव तालुक्यात बाबाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू,सर्व नातेवाईक जमले,अचानक ‘तेच वृद्ध’ घरी परतल्याने कुटुंबीयांसह नातेवाईकही थक्क.
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.