भडगाव: येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित सौ.रजनीताई नानासाहेब देशमूख कला, वाणिज्य व विज्ञान महा विद्यालय, भडगाव जि. जळगाव येथील भूगोल विभागात दि. २२ सप्टेंबर २०२३ ला विषूवदिन साजरा करण्यात आला. विषूवदिन ही एक भौगोलिक घटना आहे. या दिवशी सूर्य पृथ्वीच्या मध्यात म्हणजे विषूववृत्तावर येतो.

त्यामूळे या भागात सूर्याची किरणे लंबरुप पडतात आणि पृथ्वी उत्तरधृव ते दक्षिण धृव अशी समान भागात प्रकाशवृत्ताने विभागली जात असल्याने संपूर्ण पृथ्वीवर १२ तासाचा दिवस व १२ तासाची रात्र असते. यानंतर सूर्य दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. अशा प्रकारच्या घटनांची विद्यार्थ्यांना व समाजाला माहिती व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन भूगोल विभागाद्वारे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष्य स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. ना. ना. गायकवाड सर यांनी भूषविले तर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक भूगोल विभाग प्रमूख प्रा. डाॅ. संजय भैसे सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देवेंद्र मस्की यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू. प्रज्ञा सोनवणे हिने केले तर आभार कू. नेहा शिरसाठ हिने केले. कार्यक्रमाला प्रा डाॅ. चित्रा पाटील, प्रा डाॅ. इंदिरा लोखंडे , प्रा.ज्योती नन्नवरे प्रा. मोहनदास महाजन, डाॅ. राजपूत तसेच द्वितीय व तृतीय वर्ष भूगोलाचे विद्यार्थी उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






