झुंजार प्रतिनिधी । एरंडोल एरंडोल :- येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन १२ मार्च रोजी करण्यात आले होते, त्याचा फायदा समाजातील तळागाळातील लोकांना झाल्याची माहिती तालूका विधी सेवा समितीचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी दिली. या लोक न्यायालयात एरंडोल न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण 11 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. तर 202 वादपुर्व प्रकरणे निकाली निघून जवळपास 71 लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली. त्याचप्रमाणे सौम्य शिक्षा असणारी 8 प्रकरणे निकाली काढण्यात आली. अशी एकूण 231 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. राष्ट्रीय लोकन्यायालयात तहसिल कार्यालय, तालूक्यातील ५२ ग्रामपंचायती, एम एस ई बी, बीएसएनएल, सेंट्रल बॅक, स्टेट बँक, बडोदा बँक यांच्याकडील थकबाकीची प्रकरणे ठेवण्यात आली होती.
एरंडोल तालूक्याच्या तहसिलदार सुचिता चव्हाण देखील लोकअदालतीचे काम पूर्ण होईपर्यंत न्यायालयात हजर होत्या. हे लोक न्यायालय यशस्वी होण्यासाठी एरंडोल वकील संघाचे सचिव अँड एम. एम. महाजन, जेष्ठ विधीज्ञ अँड ए. एम. काळे,अँड ए. टी. पाटील,अँड आर.एम. दाभाडे, अँड अहमद सैय्यद,अँड अजिंक्य काळे,अँड दीपक पाटील व इतर सदस्य तसेच न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी,तहसील ,नगरपालिका, बीएसएनएल,विज वितरण कंपनी, यांनी सहकार्य केले. जेष्ठ विधीज्ञ आर. एम. दाभाडे व डी. एस. पाटील यांनी पंच न्यायाधीश म्हणून काम केले. तर प्रमुख पंच म्हणून न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी काम पाहिले.
फोटो ओळ :- एरंडोल येथे लोक न्यायालय प्रसंगी मार्गदर्शन करताना न्यायाधीश विशाल धोंडगे व पक्षकार नागरिक