कृषी दुतांकडून दहिवद येथे बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक

Spread the love

पाचोरा :- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय धुळे मार्फत राबवण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्य कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदूत मनोज केंचे, प्रसाद गायकवाड,,हर्षवर्धन गायकवाड, अक्षय गावडे,सुशांत खामकर,नागेश्वर क्षीरसागर यांनी दहिवद येथे बियाणे उगवण क्षमता तपासणी या विषयावर प्रात्यक्षिक घेतले.

या कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सी.डी. देवकर सर , डॉ.व्ही एस गिरासे सर ,डॉ. विकास पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पेरणीपूर्वी बियाणे उगवण क्षमता तपासणीची गरज व फायदे, किमान बियाणे प्रमाणित मानकांनुसार विविध बियाणांची उगवण क्षमता टक्केवारी चाचणी कशी करावी,विविध बियाणांचे प्रकार (आण्विक बियाणे, पैदासकाराचे बियाणे, पायाभूत बियाणे, प्रामाणिक बियाणे, सत्यप्रत बियाणे, नोंदणीकृत बियाणे) याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या दर्शवलेल्या प्रात्यक्षिकाचा अवलंब करून निश्चितच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी नोंदवली.

हे पण वाचा

टीम झुंजार