यावल : तालुक्यातील बामणोद येथील एका १९ वर्षीय तरुणीचा तिच्या घरात जाऊन गावातीलच एकाने तिच्या मनाला लज्ज्या उत्पन्न होईल असे कृत्य केले व तिचा विनयभंग केला. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बामणोद ता.यावल या गावात लिंबूनी नगर मधील रहिवाशी गोपाळ उत्तम भालेराव हा गावातील १९ वर्षीय तरुणीच्या घरात गेला आणी तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला व नंतर तिला अश्लील शिवीगाळ केली.

आणि या १९ वर्षीय मुलीच्या आई-वडिलांना देखील मारहाण केली. तेव्हा १९ वर्षीय पिडीत तरुणीने फैजपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली व गोपाळ भालेराव यांच्याविरुद्ध विनयभंग सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






