Viral Video: भरधाव वेगाने जात असलेल्या रिक्षाचे चाक तुटल्याने रिक्षा थेट हवेत, CCTV मध्ये कैद.पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: सोशल मीडियावर रिक्षाच्या अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रिक्षाचे चाक तुटल्याने हा रिक्षा हवेत उडाल्याचं दिसत असून त्यामुळे मोठा अपघात झाला आहे. हा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही.

तर एक रिक्षा रस्त्याने भरधाव वेगाने जात असताना त्याचे पुढचे चाक तुटते आणि ते चाक रिक्षाच्या खाली येऊन रिक्षा आकाशात जवळपास तीन फुटापर्यंत उडतो आणि खाली पडतो. दरम्यान, रिक्षा पलटी झाल्यानंतर या अपघातात रिक्षा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे.

रिक्षा पलटल्यानंतर तेथील नागरिक मदतीसाठी धावले आणि त्यांनी अपघातग्रस्त ड्रायव्हरला मदत केल्याचं दिसत आहे. दरम्यान, रिक्षात बसून प्रवास करणे किती योग्य आहे असा सवाल नेटकऱ्यांनी केला असून अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शअर केला आहे.

हे पण वाचा


टीम झुंजार