आजचे राशीभविष्य, ( शनिवार , ३० सप्टेंबर २०२३ )

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

आज दिवशी चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. विनाकारण खर्च वाढतील. आर्थिक गुंतवणूक करू शकाल. परोपकारात गमावून बसण्याचे संकट येईल. आर्थिक देवाण – घेवाण करताना सावध राहावे. गूढ विषयांकडे कल होईल. लोभाच्या लालसे पासून दूर राहा. निर्णयशक्तीच्या अभावाने द्विधा मनःस्थिती होईल.

वृषभ :-

आज दिवशी चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार व प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबीय व मित्र यांच्यासह आनंदात राहू शकाल. नवे संबंध व नवे परिचय व्यापारात लाभप्रद होतील. लहानसा प्रवास आनंददायी होईल. आजचा संपूर्ण दिवस उल्हास व प्रसन्नतेने भरलेला असेल.

मिथुन :-

आज दिवशी चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी – व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल. व्यापारी कामाची कदर करतील. त्यामुळे आपणास जास्त प्रोत्साहन मिळेल. बढती संभवते. समाजात मान – प्रतिष्ठा वाढेल. सरकारी कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल.

कर्क :-

आज दिवशी चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. मंगल कार्य किंवा प्रवास ह्यावर खर्च होईल. कुटुंबीय व वरिष्ठ ह्यांच्यासह दिवस सौख्यदायी होईल. नोकरीत सुद्धा लाभ होतील.

सिंह :-

आज दिवशी चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रकृतीसाठी खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. कुटुंबियांशी मतभेद होतील. अवैध कामामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे. योग्य मार्गदर्शन मिळविण्यासाठी प्रयत्न करा.

कन्या :-

आज दिवशी चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज दांपत्य जीवनात सुखद क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. वस्त्रे, अलंकार, वाहन इत्यादींची खरेदी होईल. भिन्नलिंगी व्यक्तीची ओळख प्रणयात परिवर्तित होईल. व्यापारात भागीदारांशी चांगले संबंध राहतील. धनलाभ होईल.

तूळ :-

आज दिवशी चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज सामान्यतः प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल. कामात सफलता मिळाल्याने उत्साह वाढेल. नोकरीत लाभदायक बातमी मिळेल व सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. भिन्नलिंगी मित्रांचा सहवास घडेल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात कराल.

वृश्चिक :-

आज दिवशी चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. नवीन कार्य शक्यतो आज सुरू करू नये. आर्थिक नियोजनासाठी अनुकूलता असल्यामुळे आपल्या कष्टाचे फळ मिळेल. जुगारसदृश बाबींपासून शक्यतो दूर राहावे. प्रवास सुद्धा शक्यतो टाळावेत.

धनू :-

आज दिवशी चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज मनात औदासिन्य दिसून येईल. शारीरिक उत्साह व मानसिक तरतरी ह्यांचा अभाव असेल. कुटुंबीयांशी तणावाच्या प्रसंगामुळे घरातील वातावरण कलुषित होईल. एखादी मानहानी संभवते. वित्तहानी सुद्धा संभवते. जमीन वा वाहना संबंधीची कागदपत्रे सावधपणे तयार करा.

मकर :-

आज दिवशी चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस नवीन कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. नोकरी, व्यापार व दैनंदिन कामात अनुकूल स्थिती असल्याने मन प्रसन्न राहील. भावंडां कडून सहकार्य मिळून लाभ सुद्धा होतील. आर्थिक लाभ संभवतात. विद्यार्थ्यांना विनासायास अभ्यास करता येईल.

कुंभ :-

आज दिवशी चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज वाद – विवाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. घरातील वातावरण कलुषित होईल. कामात अपयश आल्याने मन दुःखी होऊन नैराश्य येईल. आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. निर्णय क्षमतेचा अभाव दिसून येईल.

मीन :-

आज दिवशी चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. उत्साह व स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्यारंभासाठी दिवस अनुकूल आहे. मित्र व कुटुंबीयांसह भोजनाचा आस्वाद घ्याल. धनलाभ संभवत असला तरी खर्च वाढणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. एखादा प्रवास संभवतो. कार्यात यशस्वी व्हाल.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार