झुंजार प्रतिनिधी । एरंडोल जळगाव :- रेड स्वस्तिक सोसायटी जळगाव आणि भगवान महावीर विकलांग सहायता समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दि.11 मार्च 2022 रोजी जळगाव शहरात संस्थेच्या कार्यालयात राज्यभरातून आलेल्या २०० दिव्यांग बांधवांना मोफत जयपूर फुट,कॅलिपर्सचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी विभागीय आयुक्त मा. रविंद्र जाधव सर, आयकरचे सहायक आयुक्त डॉ.उज्वलकुमार चव्हाण सर, माजी माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील, पिपल्स बँकेचे मा.भालचंद्र पाटील,
रेड स्वस्तिकचे सहमहा व्यवस्थापक अशोकजी शिंदे साहेब, महापौर सौ.जयश्रीताई महाजन, पी.ई.तात्या पाटील,उडाण फांउंडेशनच्या हर्षाली चौधरी,अॅड. राजेश झाल्टे साहेब, डॉ. धनंजय बेंद्रे साहेब, जे. बी. पाटील सर, रोशनभाऊ मराठे, नगरसेवक वीरेन खडके, मीनाक्षी पाटील, नारायण व्यास उपस्थित होते.
यावेळी नंदूभाऊ रायगडे, डॉ.प्रमोद अमोदकर, मनीषभाऊ चव्हाण, डॉ. एस. एस. पाटील सर, दिलीप गवळी, आनंदराव मराठे, डॉ. धनंजय बेंद्रे, संजय काळे, संजय आवटे, नाना सोनवणे, ढोलमदास चव्हाण, दीप पाटील, नीलेश पाटील, डॉ. गणेश पाटील, योगेश काळे, डॉ. गणेश रोटे, अॅड. महेश भोकरीकर, जितू कोळी, महेश पाटील, सुनील पालवे, मुकुंद गोसावी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप दारकोंडे यांनी केले, तर आभार डॉ. धनंजय बेंद्रे यांनी मानले.