Viral Video: आजकाल सोशल मीडियाच्या युगात जवळजवळ प्रत्येकालाच खास व्हिडिओ बनवून अल्पावधीत लोकप्रियता मिळवायची आहे. यासाठी अनेक लोक हटके व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ते व्हायरल होतील.
काहीतरी नवीन करून पाहण्याच्या उदेशाने काही लोक धोकादायक स्टंट करताना दिसतात, तर काही लोक व्हिडिओ बनवण्यासाठी धोकादायक ठिकाणे निवडतात. आता असेच एक धक्कादायक प्रकरण उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून समोर आले आहे.
जहांगीराबादचा रहिवासी असलेला एक तरुण रील बनवण्याच्या नादात आपला जीव गमावून बसला आहे. फरमान असे या तरुणाचे नाव असून तो 14 वर्षांचा होता. फरमान रेल्वे रुळांवर बेपर्वाईने रील तयार करत असताना त्याला धावत्या ट्रेनने धडक दिली, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
सध्या या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अहवालानुसार, फरमान आपल्या 3 मित्रांसह मिरवणूक पाहण्यासाठी जात होता. मात्र, मध्येच त्याने रेल्वे क्रॉसिंगजवळ थांबून रुळावर रील बनवण्याचा विचार केला. त्याच्या मित्रांनीही त्याचे म्हणणे मान्य केले. त्यानंतर काहीही विचार न करता फरमान रेल्वे रुळावर जाऊन उभा राहिला व त्याचवेळी ट्रेनने त्याला धडक दिली.
हा व्हिडिओ तुम्हाला विचलित करू शकतो-
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






