Calcium-Rich Foods That Improve Your Bones : तारुण्यात हाडं कडकड वाजतात? आहारात हवेच मग ४ पदार्थ, तब्येत सांभाळा
तिशीनंतर हाडं मजबूत राहणे अत्यंत गरजेचं आहे. मुख्य म्हणजे तिशीनंतरच हाडे ठिसूळ होतात. यासाठी आहारात कॅल्शियमयुक्त (Calcium) पदार्थ असायलाच हवे. तिशीनंतर बहुतांश जणांना हाडे दुखणे, दातांच्या समस्या निर्माण होतातच. मुख्य म्हणजे ज्या महिला तिशीनंतर गर्भवती राहतात, त्यांना कॅल्शियमची जास्त गरज असते, कारण गर्भधारणेदरम्यान कॅल्शियम आवश्यक असते.
यासंदर्भात पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल सांगतात, ‘महिलांना दररोज १००० मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. आपल्या आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने आणि इतर पौष्टिक घटकांचा योग्य प्रमाणात समावेश असावा. हाडे मजबूत झाल्याने ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांची शक्यता कमी होऊ शकते. यासाठी हाडांच्या आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं आहे’
हाडं मजबूत करण्यासाठी खा ४ पदार्थ

पालेभाज्या
आहारात पालेभाज्यांचा समावेश असणं गरजेचं आहे. पालेभाज्या हे कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे हाडंच नाहीतर, आरोग्यही सुधारते.
पांढरे तीळ

पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. यासह यात फायबर आणि प्रोटीनही आढळते. आपण तीळ भाजी, मसाले किंवा इतर कोणत्याही पदार्थात मिक्स करून खाऊ शकता.
पनीर

दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. पनीरमध्ये प्रोटीन, फॉस्फरस आणि कॅल्शियम आढळते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. यासह सांधेदुखीपासून आराम मिळतो.
बदाम

बदाम कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे उत्तम स्त्रोत आहे. नियमित बदाम खाल्ल्याने हाडांचे आरोग्य सुधारते. याशिवाय बदाम हे प्रथिने, फायबर आणि इतर जीवनसत्त्वांचे पॉवरहाऊस आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






