पाचोरा :- तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
इतिहास विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे जीवन व चरित्र यावर आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, जगातील सर्वच क्रांती ह्या हिंसेच्या मार्गाने झालेल्या आहेत. केवळ भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेली राज्यक्रांती हीच अहिंसेच्या मार्गाने झाली आहे. त्यामागे महात्मा गांधींचे नेतृत्व आणि त्यांची प्रेरणा कारणीभूत होती. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढा हा जगातील इतर स्वातंत्र्यलढ्यांपेक्षा वेगळा आहे.
महात्मा गांधींनी जगाला सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ही तीन मूल्ये दिली. त्यामुळे महात्माजींचे विचार आजही कालसुसंगत आहेत. त्याचप्रमाणे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांनीही स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीमध्ये आपले मोठे योगदान दिले आहे. परकीय आक्रमण व अन्नधान्याची टंचाई या दोन्ही संकटांमधून शास्त्रीजींनी भारताला बाहेर काढले आणि ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला. साधी राहणी व उच्च विचारसरणी असे व्यक्तिमत्व असलेले शास्त्रीजी आजही आपल्याला प्रेरणा देतात.
अभिवादन कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा.एस. आर. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एन. एन. भंगाळे हे विचार मंचावर उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जनार्दन देवरे यांनी केले तर डॉ. मानसिंग राजपूत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हे पण वाचा
- जळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा,8 जुगारींना अटक, 20 लाख रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त.
- अनेक वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध,प्रेयसी लग्नासाठी पळून आली प्रियकराकडे, पण त्याने दिला धोका अन्…. एक SMS अन् 6 महिन्यांनी अंगावर काटा आणणारी कहाणी.
- धरणगाव तालुक्यात बाबाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू,सर्व नातेवाईक जमले,अचानक ‘तेच वृद्ध’ घरी परतल्याने कुटुंबीयांसह नातेवाईकही थक्क.
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.