पुणे:– विमाननगर परिसरातील एका कॅफेमध्ये पार्टी करून घरी निघालेल्या महिलेला घरी सोडण्याचा बहाणा करून तिला लॉजवर नेत बलात्कार केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला अटक केली असून, दत्तात्रय देविदास खरात (२७, रा.लेन नं. ९. म्हाडा कॉलनी, विमानननगर) असे त्याचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर परिसरात बॅकयार्ड कॅफे आहे. या कॅफेत पीडित महिला, तिच्या दोन मैत्रिणी एक मित्र गुरूवारी रात्री पार्टी करण्यासाठी गेले होते. दहा हजार रुपये पार्टीचे बील झाले. संबंधीत महिलेने डेबिट कार्डद्वारे बील देण्याचा प्रयत्न केला. मात्र, डेबिट कार्डचा पासवर्ड लक्षात नसल्याने बील भरणा होऊ शकला नाही. त्यानंतर कॅफेतील व्यवस्थापक आणि कामगारांनी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली.
त्यांच्याकडील दोन मोबाइल, पॅनकार्ड, आधारकार्ड, डेबिट कार्ड काढून घेतले. बील भल्यानंतर जप्त केलेल्या वस्तू परत करू असे त्यांनी सांगितले. पीडित महिलेसोबत असलेले मित्र आधीच निघून गेले होते, त्यानंतर महिला कॅफेच्या बाहेर आली असता, दत्तात्रय खरात याने त्यांना मदत करण्याचा बहाणा करत घरी सोडतो असे सांगून त्याच्या दुचाकीवर बसवले. तेथून त्याने खराडी येथील एका हॉटेलमध्ये नेत त्यांच्यावर बलात्कार केला.
या प्रकारानंतर पीडित महिलेने विमानतळ पोलिस धाव घेत, संबंधित आरोपीविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखत दत्तात्रय खरात याला तात्काळ ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखील पोलिस उपनिरीक्षक चौधरी या पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






