गुलाबरावजी पाटील यांची माजी पालकमंत्र्यांवर जोरदार टीका, मी डीपीडीसीतून शंभर कोटी रुपये देणारा एकमेव पालकमंत्री आहे

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी

जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे वीज उपकेंद्राचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातल्या तत्कालीन पालकमंत्री गिरिश महाजन यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. तसेच भाजपचे आमदार नितेश राणेंवर देखील टीकास्त्र सोडले आहे. “शंभर कोटी रुपये डीपीडीसीतून जिल्ह्यासाठी देणारा मी एकमेव पालकमंत्री असल्याचे स्पष्ट केले. एकहाती सत्ता असतानाही माजी पालकमंत्र्यांना जमले नाही. केवळ राजकारण करुन अधिकार्‍यांना धमकाविणे एवढेच काम त्यांनी त्यांच्या काळात केले. त्यांनी निधी दिला असता तर जळगाव शहराचा सत्यानाश झाला नसता”, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

तसेच नितेश राणे यांनी रत्नागिरी येथील कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत टीका केली होती. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सर्वांना पुरुन उरतील. असे अनेक ठाकरे आणि पवार ते खिशात घेऊन फिरतात”, अशी टीका नितेश राणे यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला गुलाबरावांनी सडेतोड आणि खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. “नितेश राणे कोण आहे? हे नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेले पिल्लू आहे. ते काय आम्हाला शिकवणार?”, अशा शब्दांत गुलाबरावांनी निशाणा साधला.‘

टीम झुंजार