जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
आज दिवशी चंद्र वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस खर्चाचा असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाण करताना सावध राहावे लागेल. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आप्तेष्टांशी मतभेद होण्याची व आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. एकंदरीत आजचा दिवस मध्यम फलदायी आहे
वृषभ :-
आज दिवशी चंद्र वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक व कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. त्यामुळे मन लावून काम कराल. आर्थिक जवाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आर्थिक आयोजन कराल. अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजन ह्यावर खर्च कराल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवाल. आत्मविश्वास वाढेल.
मिथुन :-
आज दिवशी चंद्र वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे तणावग्रस्त राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. मित्र व कुटुंबीयांच्या बाबतीत काही घटना घडतील. कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा. आपले बोलणे किंवा व्यवहार ह्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. एखादा अपघात संभवतो. आज आपला खर्च अधिक होईल. मानसिक चिंतेने मन त्रस्त होईल. वायफळ कामावर शक्ती खर्च होईल.
कर्क :-
आज दिवशी चंद्र वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणासाठी लाभदायी आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. जोडीदार व संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. संततीशी सुसंवाद साधू शकाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. चिंता दूर होतील. मित्रांसह एखाद्या नैसर्गिक स्थळी जाण्याची योजना आखाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
सिंह :-
आज दिवशी चंद्र वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. खंबीर मन व दृढ निश्चय ह्यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ होईल. कला व क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. धनाच्या दृष्टीने सरकारी कामे सफल होतील. घराचा कागदोपत्री व्यवहार करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे,
कन्या :-
आज दिवशी चंद्र वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धर्मिक कार्य व प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व संबंधीतांशी होणार्या चर्चेमुळे आनंद होईल. विदेशातील स्नेह्यांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांमुळे आर्थिक फायदा होईल
तूळ :-
आज दिवशी चंद्र वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. सरकार विरोधी कामे, राग इत्यादींपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन संबंध जुळवू नये. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
वृश्चिक :-
आज दिवशी चंद्र वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करून आनंद – प्रमादात आपण व्यस्त राहाल. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन मन प्रसन्न होईल. समाजात मान – सन्मान होतील. मित्र व कुटुंबियांशी हिंडणे – फिरणे आनंददायी ठरेल.
धनू :-
आज दिवशी चंद्र वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल. त्यामुळे मन आनंदी राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्यवसायात लाभ होईल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो.
मकर :-
आज दिवशी चंद्र वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपले मन चिंतातुर व द्विधा अवस्थेत राहील. अशा मनःस्थितीत आपण कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. नशिबाची साथ नसल्याने आज कोणतेही महत्वाचे काम न करणे हितावह राहील. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. वडिलधार्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च होतील. संततीशी मतभेद संभवतात.
कुंभ :-
आज दिवशी चंद्र वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. मनात एखादी आर्थिक योजना आखाल. स्त्रीयांचे अलंकार, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने ह्यावर पैसा खर्च होईल. मातेकडून लाभाची शक्यता आहे. जमीन, घर व वाहन इत्यादींचे व्यवहार काळजी पूर्वक करावेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूलता लाभेल. कोणत्याही गोष्टीत हट्टीपणा करू नका.
मीन :-
आज दिवशी चंद्र वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस शुभ आहे. जोडीदारा सोबत दिवस आनंदात जाईल. मित्रांसह छोटीशी सहल आयोजित कराल. भावंडां कडून लाभ होईल. कार्यात यश मिळेल. मान- सम्मान होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






