मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यातून त्यांनी “कमाल आहे ! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?,” असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. दरम्यान, भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीनंतर सागर बंगल्यात देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी स्वतंत्र बैठक घेतली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक असे ट्विट केले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतेच सूचक असे ट्विट केले आहे. त्यांनी त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे. दरम्यान काल नोटीस बजावण्यात आल्यानंतर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांचे पथक देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर एसीपी नितीन जाधव यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक दाखल होत त्यांनी फडणवीसांची चौकशी सुरु केली आहे.