शांतता समितीचे सर्व सदस्य राजीनामे देणार.
एरंडोल :-अनंत चतुर्दशीच्या दिवशी शांततेत गणेश विसर्जन झाले असतांना केवळ मिरवणुकीस उशीर झाला या कारणास्तव पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांच्या पदाधिका-यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांचा सर्वपक्षीय पदाधिका-यांकडून निषेध करण्यात आला.सर्व सार्वजनिक उत्सवात पोलीस प्रशासनाला सहकार्य
करणा-या शांतता समितीच्या सदस्यांनी पदाधिका-यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ सामुहिक राजीनामे देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेल्या वकील संघाच्या पदाधिका-यांनी मंडळाच्या पदाधिका-यांवरील गुन्ह्याबाबत न्यायालयात मोफत बाजू मांडणार असल्याचे जाहीर केले.गणेशोत्सवासंदर्भात गणेश मंडळाचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्य यांची बैठक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती.बैठकीत सर्व
गणेश मंडळांनी कोणत्याही समाजाच्या अथवा धर्माच्या भावना दुखावणार नाहीत असे देखावे सादर करू नयेत असे आवाहन प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक गणेश
मंडळांच्या पदाधिका-यांना केले होते.

शांतता समिती सदस्य व मंडळाच्या पदाधिका-यांनी प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देवून सामाजिक जनजागृतीवर आधारित देखावे सादर केले होते. मंडळाच्या पदाधिका-यांनी प्रशासनास सहकार्य
केल्यानंतर देखील केवळ मिरवणुकीस उशीर झाला या कारणास्तव गुन्हे दाखल करण्यात आले.शहरात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.विसर्जन
मिरवणुकीस उशीर झाल्याच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाने अठरा पैकी सतरा गणेश मंडळाच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल केल्यामुळे सर्वपक्षीय
पदाधिका-यांची बैठक सीतारामभाई बिर्ला सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
माजी नगराध्यक्ष देविदास महाजन अध्यक्षस्थानी होते.बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईचा निषेध केला.यावर्षी श्रीगणेशाच्या अतिभव्य
मुर्त्या असल्यामुळे रस्त्यावरून जातांना पदाधिका-यांना कसरत करावी लागत असल्यामुळे मिरवणुकीस उशीर झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.पोलीस प्रशासनाने शांतता समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता मंडळाच्या पदाधिका-यांनी एकतर्फी निर्णय घेवून गुन्हे दाखल केल्याचा आरोप यावेळी पदाधिका-यांनी केला.
पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई अन्यायकारक असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत आमदार चिमणराव पाटील यांनी देखील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेशी संपर्क साधून
गुन्हे मागे घेण्याची मागली केली.मुख्यमंत्री कार्यालयात आमदार चिमणराव पाटील यांनी संपर्क साधून पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली. मंडळाच्या पदाधिका-यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ सर्व शांतता समितीचे सदस्य राजीनामा देणार असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले.
माजी नगरसेवक विजय महाजन यांनी प्रास्ताविक केले.संजय चौधरी यांनी सुत्रसंचलन केले.बैठकीस माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,रमेश परदेशी,राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर, दशरथ महाजन,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत), कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस आर.डी.पाटील,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर,संजय महाजन,प्रा.शिवाजीराव अहिरराव, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन,उबाठा. शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन,वकील संघाचे
अध्यक्ष अँड.महेश काबरा,सचिव अँड.ज्ञानेश्वर महाजन, अँड.आकाश महाजन, अँड.कैलास भाटीया,अँड.प्रेमराज पाटील,अँड.दिपेश पांडे, अँड.अजिंक्य काळे,अँड.विशाल महाजन यांचेसह विविध राजकीय पक्षांचे
पदाधिकारी व मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






