शहरातील शांतता धोक्यात आणणा-या समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी,हिंदू संघटनांच्यावतीने मूकमोर्चा.

Spread the love

एरंडोल :- शहरात ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये सहभागी झालेल्या युवकांनी पांडववाडा परिसर व काही विशिष्ट ठिकाणी थांबून
आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावतील घोषणा दिल्यामुळे शहरातील शांतता धोक्यात आणणा-या समाजकंटक आणि धर्मांध समाज कंटकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू संघटना आणि सर्वपक्षीय पदाधिका-यांनी तहसीलदार सुचिता चव्हाण,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदनवाळ,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

समाजकंटकांविरोधात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.धार्मिक आणि आखेपार्ह घोषणा देणा-यांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी विविध हिंदू संघटना आणि राजकीय पक्षांच्यावतीने तहसीलदार कार्यालय आणि पोलीस स्टेशनवर मूकमोर्चा काढण्यात आला. शहरात ईद-ए-मिलाद निमित्त जुलूस काढण्यात आला होता. जुलूसमध्ये सहभागी झालेल्या युवकांनी धार्मिक तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह घोषणा दिल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जुलूस शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जात असतांना विशिष्ट ठिकाणी थांबून विविध घोषणा देवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.तसेच पांडववाडा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रसाद दंडवते यांच्या निवासस्थानासमोर शोहील पिंजारी यांनी जुलूस थांबवून शिवराळ भाषा वापरून आक्षेपार्ह घोषणा दिल्या. जुलूसमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांच्या हातात असलेल्या काठ्या व लोखंडी पाईप रस्त्यावर जोरजोरात आपटून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच दंडवते यांच्या घरावर पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या होत्या.

जुलूसमध्ये शहरासह ग्रामीण भागातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.याबाबत प्रशासनाने त्वरित दखल घेऊन आयोजक आणि आक्षेपार्ह घोषणा देणा-या समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोर्चेक-यांच्यावतीने करण्यात आली. मुकमोर्चाला पंचायत समितीपासून सुरुवात करण्यात आली.मुकमोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी काळ्या फिती लाऊन निषेध व्यक्त केला.

पहा मुकमोर्चा व्हिडिओ

मुखमोर्चात माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी,दशरथ महाजन,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी
विजय महाजन,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत),उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन,प्रा.शिवाजीराव अहिरराव, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर,डॉ.नरेंद्र पाटील,संजय महाजन,युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन, अनिल महाजन,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,शोभना साळी,भाजपचे तालुका सरचिटणीस अमोल जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस आर.डी. पाटील, राजा भेलसेकर यांचेसह विविध राजकीय व हिंदू संघटनांचे पदाधिकारी व हजारो नागरिक उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार