एरंडोल :- तालुक्यातील एका गावात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लाऊन पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी संशयितास धरणगाव रेल्वे स्टेशन येथून
अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी,की एरंडोल तालुक्यातील एका गावातील चौदा वर्षीय मुलगी ३० नोव्हेंबर पासून बेपत्ता झाली होती.
पिडीत बालिकेचे वडील व परिवारातील सदस्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता ती सापडली नाही. गावातीलच तुषार कैलास मोरे (भिल) याचेवर पिडीताच्या वडिलांचा संशय आल्याने त्याच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी पिंपळकोठा येथे चौकशीसाठी गेले असता संशयिताच्या परिवारातील सदस्यांनी पोलीस गावात चौकशीसाठी आले असल्याची माहिती त्याला कळवली होती.संशयित तुषार भिल हा अल्पवयीन मुलीश सुरत येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल,हवालदार प्रशांत पाटील,विलास पाटील,अकिल मुजावर,रवींद्र तायडे यांनी अल्पवयीन मुलीचा भाऊ आणि नातेवाईक यांनी धरणगाव रेल्वे स्टेशनवर सापळा रचला आणि संशयितास आणि अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले.उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहका-यांच्या सतर्कतेमुळे तुषार भिल हा पोलिसांच्या तावडीत सापडला.संशयित तुषार भिल व अल्पवयीन मुलगी कासोदा येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या झोपडपट्टीत राहिले होते.
संशयिताने पाण्याच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते.दोन दिवस मुलीस केवळ एक वेळ जेवण देण्यात आले होते.याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तुषार भिल याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.पोलिसांनी तुषार मोरे (भिल) यास अटक केली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






