शासकीय अनुदानापासून वंचित असलेल्या शेतक-यांना अनुदान देण्यात यावे; शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांची मागणी.

Spread the love

एरंडोल :- शासनाच्या अनुदानापासून वंचित असलेल्या तालुक्यातील शेतक-यांना त्वरित अनुदान देवून दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना
दिलेल्या निवेदनात केली आहे.जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की २०१७ यावर्षी तालुक्यातील शेतक-यांना ६७ टक्के अनुदान देण्यात आले होते तर उर्वरित ३३ टक्के अनुदान मिळण्यासाठी शेतक-यांनी सामूहिकरीत्या उच्च
न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयाने शेतक-यांना ३३ टक्के अनुदान देण्यात यावे असे आदेश २०२१ मध्ये दिले होते,मात्र अद्यापपर्यंत शेतक-यांना अनुदानाचे वाटप करण्यात आलेले नाही.सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान देखील अद्यापपर्यंत शेतक-यांना देण्यात आलेले नाही.मार्च,एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीपासून देखील शेतकरी वान्चीर राहिले आहेत.अनेक ठिकाणी शेतक-यांचे वेगवेगळे लहान क्षेत्र आहे अशा शेतक-यांचे वेगवेगळे पंचनामे करण्यात आले

मात्र एकाच क्षेत्राचे अनुदान देण्यात आले असून उर्वरित क्षेत्राच्या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या वंचित असून तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.जिल्ह्यातील शेतक-यांचे आधारकार्ड हे कुळानुसार करण्यात आले आहेत.मात्र शेतजमीन टोपण नावाने नोंदविण्यात आली आहे.त्यामुळे शेतक-यांच्या नावावर आधारकार्डानुसार शेतजमीन दिसत नाही. त्यामुळे शेतक-यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही.

कृषी विभागाला तांत्रिक अडचण सोडविण्याचे आदेश दिले आहेत मात्र कृषीविभागाकडे गेल्यास त्यांना तहसीलदार कार्यालयाकडे पाठवले जाते तर तहसीलदार कार्यालय कृषी विभागाकडे जा असे सांगत असल्यामुळे शेतक-यांना या दोन्ही कार्यालयांमध्ये फे-या माराव्या लागतात.याबाबत स्वतंत्र यंत्रणा राबवून शेतक-यांची समस्या दूर करावी.याबाबत त्वरित दखल घेवून शेतक-यांना शासकीय अनुदान देवून दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांनी केली आहे.

टीम झुंजार