संतापजनक! गुप्तधन काढण्यासाठी पूजेला बसण्याचा विरोध करणाऱ्या विवाहितेवर पतीसह सासऱ्याने केला अनैसर्गिक अत्याचार.

Spread the love

बीड :- शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गुप्तधन काढण्यासाठीच्या पूजेला बसण्याचा विरोध केल्यानंतर एका महिलेवर पतीसह सासऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शहरातील शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुप्तधन काढण्यासाठी घरात पूजा मांडली होती.

या पूजेला बसण्यासाठी आरोपींनी पीडितेला आग्रह केला. मात्र, या गोष्टीला पीडित महिलेने विरोध केला. त्यामुळे पती आणि सासऱ्यांनी तिला बेदम मारहाण केली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पीडित महिलेचे हातपाय बांधले. तसेच तिच्या तोंडात बोळा कोंबून अनैसर्गिक अत्याचार केला. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेत आपल्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला

दरम्यान पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पीडितेचा पती, सासरा, नणंद, नंदावा यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार व जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना अटक देखील केली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार