झुंजार प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- महिला दिनानिमित्त 8 मार्च पासून सुरू झालेल्या सप्ताहात एरंडोल येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले..8 मार्च रोजी मॅरेथॉन स्पर्धा व 12 मार्च रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा एरंडोल येथील पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या सुविद्य पत्नी सौ. मीनल जाधव ह्या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. मॅरेथॉन स्पर्धेत दोन गटांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या सर्व महिलांना पारितोषिक देण्यात आले. डॉ. उज्वला राठी व जि.प.खडके शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. क्षमा साळी यांच्याकडून विजेत्यास 701, 501, 301 प्रत्येकी तर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते यांच्याकडून सर्व विजेत्यास ट्रॉफी देण्यात आली, सर्व सहभागी स्पर्धकांना साळी महिला मंडळाकडून प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
“एक दिवस स्वत:साठी” असे म्हणून सुरू झालेल्या या कार्यक्रमात शहरातील एकूण 15 मंडळांनी सहभाग नोंदवला होता. समाज प्रबोधनपर, विनोदी, सांस्कृतिक अशा बहुरंगी नटलेल्या या कार्यक्रमात 500 च्यावर हजेरी लावलेल्या सर्व महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला रेणुका महिला मंडळातर्फे व्रत मौजीबंधनाचा कार्यक्रम, जिजाऊ महिला मंडळाचा विधवा पुनर्विवाह, साळी महिला मंडळाचे भारुड, अहिर सुवर्णकार महिला मंडळाचे शिवजन्मोत्सव, मानसी महिला मंडळाचे फॅन्सी ड्रेस स्पर्धा, शारदोपासक महिला मंडळाचे स्त्री जन्माची कहाणी, आस्था महिला मंडळा चे जुन्या हिंदी गीतावरिल नृत्य, जागृती महिला मंडळाचे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली, सम्यक इंग्लिश मीडियम स्कूल यांचे कोरोना काळातील डॉक्टरांचे योगदान, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल चे स्त्री जीवनावरील नृत्य, गुजर महिला मंडळाचे आजच्या मुलींच्या लग्नाच्या अपेक्षा,गणपती महिला भजनी मंडळ व साई गजानन भजनी मंडळ यांनी भजन सादर केले याच सोबत अनेक विनोदी नाटिका व नृत्य ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचा शेवट खैरनार मॅडम यांच्या सुमधुर गीताने करण्यात आला.कोणत्याही प्रकारची स्पर्धा न करता व वयाची तमा न बाळगता तरूण स्त्रियां पासुन जेष्ठ महिलांनी आपल्या कलागुणांचा अविष्कार घडविला. मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना युवा उद्योजक सनी जाधव यांच्याकडून अल्पोपहार तर तुषार मोराणकर यांच्याकडून कोल्ड्रिंक देण्यात आले.
आदिनाथ सुपर शॉपीचे हर्षल काळे यांच्याकडून सर्व प्रायोजकांना भेटवस्तू देण्यात आल्या. माजी नगरसेविका छाया दाभाडे, महाजन कलेक्शन, जैन भाभी, खैरनार मॅडम,दर्शना तिवारी, रश्मी दंडवते,मीनाक्षी पाटील यांच्याकडून कार्यक्रमासाठी आर्थिक सहाय्य लाभले. एरंडोल शहरातील नगरसेविका सौ.वर्षा शिंदे, सौ.आरती महाजन, सौ.प्रतिभा पाटील, विविध मंडळाच्या अध्यक्षा व महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या. क्षमा साळी, मनीषा पाटील व सपना तिवारी यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव, शोभा साळी, संध्या बडगुजर,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,रश्मी दंडवते,आरती ठाकुर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले..महिलांच्या कलागुणांना वाव मिळणार्या या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.