यावल : तालुक्यातील भोरटेक या गावी माहेरी आलेल्या पत्नीसोबत तिच्या पतीने व पतीच्या मित्राने वाद घातला आणि वाद करू नको अशा सांगण्यास गेलेल्या सासऱ्याला त्यांनी मारहाण करून दुखापत केली. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोरटेक ता. यावल येथील अशोक लीलाधर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी काजल ही माहेरी आली होती. तेव्हा तिच्या पाठोपाठ तिचे पती गोविंदा पंढरीनाथ सपकाळे व त्यांचा मित्र विक्की दोन्ही राहणार अंजाळे ता.यावल हे दोन जण आले व त्यांनी अशोक कोळी यांच्या मुली सोबत वाद घालायला सुरुवात केली.
तेव्हा भांडण सोडवण्यासाठी गेलेले अशोक कोळी यांना त्यांनी मारहाण करीत कोयत्याने त्यांच्या बोटाला दुखापत केली. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रभाकर चौधरी करीत आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा