छत्रपती संभाजीनगर :- मध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये दोन दिवसात चार जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.या प्रकरणी पोलिसात नोंद झालीय. एका महिलेने वारंवार पती संशय घेत असल्याने कंटाळून जीवन संपवलं. ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत तिने आत्महत्या केली. चिकलठाणा परिसरात ही घटना समोर आलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंजली नावाच्या महिलेने घरात गळफास घेत जीवन संपवले. त्याआधी तिने भिंतीवर आपली सुसाइड नोटही लिहिली होती. आता माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे गेलंय. मला हे सहन होत नाही. तुमचा स्वभाव मी कितीही प्रयत्न केला तरी बदलू शकत नाही. मला माहिती आहे तुम्ही आज ना उद्या मला गावाकडे नेऊन सोडता. परत मला आणणार नाही. मात्र हे असं कितीवेळ चालणार आहे. माझी पण इज्जत आहे. माझाही स्वाभिमान आहे. माझ्या आई-वडिलांचा अपमान किती सहन करायचा. खरंच खूप थकले मी असं महिलेनं भिंतीवर लिहिलं आहे.
दुसरा घटनेत हडको परिसरातील रमानगरातील श्रद्धा राजेंद्र यादव या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिसऱ्या घटनेत जाधव वाडी परिसरातील प्रदीप शेषराव भोसले यांनी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केली. चौथ्या घटनेत रेल्वे स्टेशन परिसरात दिनेश रमेश ढोबरे या तरुणाने राहत्या घरी पत्राच्या शेडला कपड्याच्या बेल्टच्या साहाय्याने आत्महत्या केली. दोन दिवसात शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी या आत्महत्या समोर आल्या आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






