जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून लाडकुबाई शाळेने दिली टपाल कार्यालयाला क्षेत्रभेट

Spread the love

भडगाव :- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव येथील विद्यार्थ्यांनी जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून भडगाव येथील टपाल कार्यालयाला क्षेत्रभेट दिली. टपाल कार्यालयातील दैनंदिन कामकाज समजून घेतले. पोस्टाच्या विविध योजना, आधार नोंदणी, पोस्ट तिकीट, पोस्ट विमा, पोस्ट कार्ड इत्यादींच्या बाबतीत सविस्तर माहिती

पोस्टल असिस्टंट किरण परदेशी व शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी दिली.टपाल कार्यालयातील कर्मचारी श्रीराम पाटील, जगदीश चव्हाण,किरण परदेशी, अक्षय देवरे, उत्तम खैरनार, अल्केश निकम ,सुदर्शन कुलकर्णी, श्याम मुसांडे,रवींद्र बैरागी यांचे सहकार्य लाभले. शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न झाला. शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी बंधू-भगिनींनी सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

हे पण वाचा

टीम झुंजार