नारर्कोटिस कंट्रोल ब्यूरोमधील कॉस्टेबलची पत्नी,दोन चिमुकल्यांच्या संशयास्पद मृत्यू; आत्महत्या नसून हत्या सासऱ्याच्या आरोप.

Spread the love

नवी दिल्ली – दिल्लीतील मुनिरकामध्ये रविवारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका बंद खोलीत तीन जणांचे मृतदेह आढळले आहेत. मृतांमध्ये २७ वर्षीय महिला आणि एक चार व दुसरा अडीच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास एका महिलेने आत्महत्या केल्याची सूचना मिळाली होती.

खोलीत प्रवेश करताच दिसले की, एका महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता तर दोन मुलांचे मृतदेह बेडवर पडले होते. तपासात तिघांच्या मनगटावर कापल्याचे निशाण आहे. पोलीस तपासात समोर आले की, महिलेचा विवाह २०१७ मध्ये जोगेंद्र शर्मा याच्याशी झाला होता. जोगेंद्र शर्मा नारर्कोटिस कंट्रोल ब्यूरोमध्ये कॉस्टेबल आहेत.

महिला आणि तिची दोन मुले दक्षिण दिल्लीतील आपल्या घरात मृतावस्थेत आढळली. वर्षा शर्मा असे मृत महिलेचे नाव आहे. त्याचबरोबर तिच्या चार व अडीच वर्षांच्या दोन मुलांचेही मृतदेह आढळले आहेत. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिकदृष्ट्या महिलेने आधी २ मुलांचा खून करून स्वत: आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मात्र मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांना लेखी तक्रार देऊन या घटनेमागचे रहस्य उलगडले. तक्रारीत मृत

महिलेच्या वडिलांनी जावई जोगेंद्र याच्यावर आरोप केले आहेत.

वर्षाच्या वडिलांनी सांगितले की, लग्नानंतर वर्षाला पती व सासरचे लोक हुंड्यासाठी त्रास देत होते. जोगेंद्र मुरादाबादला राहायचा. अनेकदा भांडणे झाल्यावर तो वर्षाला माहेरी दिल्लीला घेऊन यायचा. वर्षाने फोनवर सांगितले होते की, तिचा पती बाहेर नशेची औषधे खायला द्यायचा. जेव्हा ती शुद्धीत नसायची तेव्हा तिच्यावर तंत्र-मंत्र केले जायचे. हे एकदा नव्हे अनेकदा केले आहे. वर्षाच्या वडिलांनी जावयाला फोनवर विचारणा केली असता त्याने वर्षावर भूत चढलंय. ज्यामुळे पूजा-पाठ केला जात आहे असं सांगायचा. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार