ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा ! शेतकऱ्यांची वीज तोडणी तूर्तास थांबवणार

Spread the love

मुंबई : मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज वीज तोडणी तत्काळ बंद करावी या मागणीवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. त्यांनी सभात्यागही केला. त्याच्या सभात्यागानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांची वीज तोडणी तूर्तास थांबवणार असल्याची घोषणा विधानसभेत केली.


विरोधी भाजप नेत्यांकडून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर वीज तोडणी व वीज बिल माफी या मुद्यावरून निशाणा साधण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वीज तोडणी प्रश्नवरून हल्लाबोल केला. “काल झालेल्या चर्चेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी संदर्भात जे आश्वासन दिले तर त्यांना पूर्ण करता आलेले नाही. हे ठाकरेंचे सरकार आहे. हे सरकार कोडगे आहे, शेतकऱ्यांबाबत संवेदना या सरकारला राहीलेली नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

टीम झुंजार