यावल : तालुक्यातील कोरपावली येथील एका ४० वर्षीय इसमाचे सोशल नेटवर्क इंस्टाग्राम चे खाते हॅक केले आणि त्यावरूनच संबंधित इसमाच्या मुलीच्या संदर्भात बदनामी कारक पोस्ट करून बदनामी केली तेव्हा या प्रकरणी एका अज्ञात विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरपावली ता.यावल येथील एका ४० वर्षीय इसमाचे इंस्टाग्रामचे खाते आहे. हे सोशल नेटवर्कचे खाते कोणीतरी हॅक केले आणि त्या खात्यावरूनच या ४० वर्षीय इसमाच्या मुलीची बदनामी कारक पोस्ट अज्ञाताने व्हायरल केली सदर प्रकार निदर्शनास येतात ४० वर्षीय इसमाने जळगाव येथील सायबर पोलीस ठाणे गाठले व अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






