घटस्थापना शुभमुहूर्त
या वर्षीचा नवरात्री उत्सव 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहे. नवरात्र उत्सव म्हणजे आदि शक्तीचा जागर करण्याचे नऊ दिवस. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्र उत्सवात अनेकांच्या घरी घटस्थापना केली जाते. तर यंदा घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय आहे ? आणि घटस्थापना कशी करावी? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
नवरात्री कलश स्थापना मुहूर्त –
नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला, कलशाची विधीपूर्वक स्थापना केली जाते तसेच 9 दिवस उपवास आणि पूजा करण्याचा संकल्प केला जातो. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर 2023 रोजी अभिजीत मुहूर्त सकाळी 11:44 ते दुपारी 12:30 पर्यंत असेल. काळात घटस्थापना करू शकता.
घटस्थापनेचा विधी –
ईशान्य दिशा हे पूजेसाठी सर्वोत्तम स्थान मानले जाते. सर्वप्रथम घटस्थापना करण्यापूर्वी चौरंगावर लाल कपडा बांधावा. एका मातीच्या भांड्यात थोडी स्वच्छ माती टाका आणि त्यात थोडे पाणी शिंपडुन गव्हाचे दाणे टाकावेत.यानंतर कलशाला मौली धागा बांधून त्यावर चंदनाने किंवा कुंकूने स्वस्तिक काढावे.घटात म्हणजेच कलशात थोडे पाणी टाकुन त्यात गंगाजल मिसळा.
त्यानंतर घटात सुपारी, दुर्वा, अक्षत आणि 1 नाणे पाण्यात टाकावे, सोबतच आंब्याची पाच पानं ठेवा. यानंतर,कलशावर नारळ ठेवा नारळाचे मुख खालच्या दिशेला असता कामा नये. कलशाच्या तळाशी थोडे तांदूळ ठेवावेत. यानंतर ज्यामध्ये गहू पेरले आहेत त्यावर कलश स्थापित करुन सर्व देवी-देवतांचे ध्यान करून पूजा सुरू करा.
30 वर्षांनंतर दुर्मिळ योग
यंदाच्या शरदीय नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. कारण तब्बल 30 वर्षांनंतर शारदीय नवरात्रीना दुर्मिळ योग जुळून येत आहे. नवरात्रीच्या सुरुवातच शश राजयोग, भद्रा राजयोग आणि बुधादित्य योगाने होत आहे. ज्योतिष शास्त्रात हो योग अत्यंत शुभ मानले जातात. पहिल्या दिवशी जुळून येत असलेल्या या तीन शुभ योगांमुळे, काही लोकांना जीवन आणि नोकरीमध्ये भरपूर लाभ मिळतील. हा योग मेष, वृषभ, कर्क, तूळ, मकर, या राशींसाठी विशेष लाभदायी ठरण्याची शक्यता आहे. तर इतरांना सामान्य लाभ होईल.
करा हा उपाय
ज्योतिषनुसार, जीवनात प्रगती तसेच शुभ फळप्राप्तीसाठी देवीची उपासना केली पाहिजे. यासाठी सकाळी लवकर उठून स्नानादी करुन साजूक तुपाचा दिवा लावा आणि नवार्ण मंत्राचा जप करा. यासह दररोज 11 वेळा दुर्गाजींच्या 32 नामांचा जप करा. दुर्गोत्सवात देवी सूक्त, सिद्ध कुंजिका आणि कवच पठण केल्याने जीवनात प्रगती होत सुख समृद्धी नांदते.
नवरात्रातील महत्त्वाचे दिवस. 15 ऑक्टोबर – घटस्थापना. 19 ऑक्टोबर – ललित पंचमी. 21 ऑक्टोबर – महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे). 22 ऑक्टोबर – दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास. 23 ऑक्टोबर – नवरात्रोत्थापना. 24 ऑक्टोबर – विजयादशमी (दसरा). काही लोकांकडून वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर सणांच्या सुमारास तारखेविषयी संभ्रम निर्माण करणारे मेसेज पाठविले जातात. त्याकडे दुर्लक्ष करावे आणि दसरा 24 ऑक्टोबर रोजी साजरा करावा.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






