यावल : शहरातील कुंभार टेकडी वरून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेतांना यावल पोलिसांना चोरट्यांची मोठी टोळीच हाती लागली आहे. यात पोलिसांनी तब्बल १४ संशयतांना ताब्यात घेतले असून त्यांनी ३७ मोटरसायकल व एक ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. तर या चोरीच्या दुचाकी पैकी १३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत देखील केल्या असुन ताब्यात घेण्यात आलेल्या १४ जणांकडून पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. सदर मोटरसायकल चोरी करून ती एजंटच्या मार्फत विक्री करायचा उद्योग शहरातील तरुण करीत होते व या तरुणांकडून अजून मोठ्या प्रमाणावर चोरीचा उलगडा होईल असे पोलिसांनी सांगितले आहे
यावल शहरातील कुंभार टेकडी येथून दिनांक १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर अजय मूलचंद पंडित यांचे ट्रॅक्टर चोरीला गेले होते. तेव्हा या चोरीच्या गुन्हा दिनांक १८ सप्टेंबर रोजी यावल पोलिसात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे व राजेंद्र पवार करीत होते दरम्यान सदर तपास करत असतांना त्यांनी अर्जुन सुभाष कुंभार वय १९ रा.कुंभारवाडा यावल यास ताब्यात घेतले व त्याने सदरील ट्रक्टर चोरीत शहरातील चौघे सांबत असल्याचे सांगीतले.
तेव्हा इतर चौघांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याकडे चौकशी केली असता चौघांनी ट्रक्टर सह दुचाकी देखील चोरी केल्याची कबुली दिली आणी यात अजुन काही जण सहभागी असल्याचे सांगीतले व पोलिसांना शहरातुन एकापाठोपाठ एक अशी एकुण १४ जणांची टोळीच मिळून आली. तेव्हा सर्व शहरातील १४ जणांना पोलिसांनी चौकशी करीता ताब्यात घेतले आहे. तर चौकशीत या सर्वांनी एक ट्रॅक्टरसह तालुक्यातील विविध गावातून तब्बल ३७ मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे.
तेव्हा पोलिसांनी १३ मोटरसायकली विविध भागातून हस्तगत करून आणल्या आहेत सदर कारवाई डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, उपनिरिक्षक मुजफ्फर खान, उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार विजय पाचपोळे, असलम खान, हवालदार राजेंद्र पवार, सुशील घुगे, योगेश खांडे, संदीप सूर्यवंशी, मोहन तायडे, अशोक बाविस्कर, अनिल पाटील, एजाज गवळी या पथकाने केली आहे. तर सदर ट्रॅक्टर हे डांभुर्णी शिवारात लपवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असुन रात्री उशीरा पर्यंत संशयीतांकडे तपास व अटक करण्याची प्रक्रीया सुरू होती.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन