जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसमवेत हर्षोल्हासात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. नव्या वस्त्रांची आणि अलंकाराची खरेदी कराल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. पण दुपारनंतर मात्र हर प्रकारे आपणाला संयमाने व्यवहार करावा लागेल. नवे संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी पूर्ण विचार करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खर्च जास्त होईल. तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करणारांपासून सावध राहा. तब्बेतीकडे लक्ष दया. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवा.
वृषभ:
व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील वातावरण सुख शांतिपूर्ण असेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. व्यवसायाच्या ठिकाणी सहकारी आपणांस मदत करतील. दुपारनंतर मनोरंजनाचा आनंद लुटाल. जवळपासचा प्रवास किंवा सहलीचा बेत ठरवाल. भागीदारांशी जरा जपून व्यवहार करा.
मिथुन:
गणेशजी सांगतात की आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम सुरू करू नका. बौद्धिक चर्चेसाठी दिवस चांगला नाही. संतती विषयक काळजी राहील. दुपारनंतर घरातील वातावरण सुख आणि शांती देणारे असेल. त्यामुळे माननसिक दृष्ट्या ताजेतवाने राहाल. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. व्यवसायात सहकारी पूर्ण सहकार्य करतील. आर्थिक लाभ होईल. कामात यश मिळेल.
कर्क:
आपली निराशा शारीरिक आणि मानसिक दृष्टया व्यस्त बनवेल. शक्यतो प्रवास टाळा. स्थावर संपत्तीचा व्यवहार स्थगित करणे आपल्या हिताचे ठरेल. आईची तब्बेत बिघडू शकते. वैचारिक पातळीवर विचलित न होण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. दुपारनंतर शारीरिक प्रसन्नता जाणवेल. नव्या कामात यश प्राप्तीची शक्यता कमी.
सिंह:
आज धार्मिक यात्रेचा संकेत श्रीगणेश देतात. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक वार्ता मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणारांना काळ लाभदायक आहे. दुपारनंतर अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढू शकेल. तब्बेत बिघडेल. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार आज करू नका. आईच्या तब्बेतीकडे विशेष लक्ष द्या.
कन्या:
कोणत्याही प्रकारे निर्णयाप्रत पोहोचण्याची स्थिती नसल्याने नवीन कार्य हाती घेऊ नका. आज मौन पाळून दिवस घालवण्यात हुशारी आहे. अन्यथा कोणाशी मतभेद होऊ शकतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सामान्य राहील. दुपारनंतर वातावरण एकदम पालटेल. घरातील इतर व्यक्तींबरोबर महत्त्वपूर्ण बैठकीत आवश्यक ते निर्णय घ्याल. प्रवास सहलीचे बेत ठरवाल. आज गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. भाग्योदयाचा दिवस आहे.
तूळ:
आजच्या दिवसाचा प्रारंभ समतोल आणि दृढ वैचारिकतेने होईल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. नवी वस्त्रे आणि अलंकार यावर जास्त खर्च होईल. दुपारनंतर मानसिकता अनिर्णित अवस्थेत बदलेल. कुटुंबीयांशी झालेले मतभेद दूर करा. महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आपला अहंकार जपण्यापेक्षा इतरांकडे लक्ष देऊन त्यांच्याशी समझोता करणे रास्त ठरेल, असे श्रीगणेश म्हणतात.
वृश्चिक:
अध्यात्म आणि ईश्वर भक्तीने मनाला शांतता लाभेल असे श्रीगणेश सांगतात. मनात येणार्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात जपून राहा. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शकयता. दुपारनंतर कार्यपूर्ती दृष्टिक्षेपात येईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जाणवेल. आत्मविश्वास वाढेल. हर्षोल्हास आणि मनोरंजन यावर पैसा खर्च होईल.
धनु:
आजचा दिवस उत्पन्नात वाढ आणि लाभ देण्याची सूचना देणारा आहे. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने मन प्रसन्न राहील. मान- सन्मान व उत्पन्नात वाढ होईल. व्यापारात लाभाची शक्यता. अपघातापासून जपा. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. वाणीवर ताबा ठेवा. कोणाशी वाद होणार नाही याकडे लक्ष द्या.
मकर:
स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायिक क्षेत्रात यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी आपणाला प्रोत्साहन देतील. बढतीचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. सामाजिक व आर्थिक क्षेत्रात लाभ होईल. मित्रांपासूनही लाभाची शक्यता.
कुंभ:
आज व्यावसायिकांना जपून वागणे आवश्यक आहे. वरिष्ठांशी बोलताना विवेक राखा. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. दीर्घकालीन प्रवासाची योजना आखाल. धार्मिक स्थळी यात्रा होण्याचे संकेत आहेत. दुपारनंतर व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. गृहस्थी जीवनात आनंद पसरेल. व्यवसायात अधिकारी वर्ग आपल्या कामावर खुश राहतील. व्यवसायात सफल आणि शुभ दिवस.
मीन:-
कोणाशी वादविवाद किंवा बांडण करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. क्रोधावर ताबा ठेवा. गूढ विद्येचे आकर्षण राहील. सुखमय बाबींत गोडी वाटेल. गहन चिंतन मनाला शांती देईल. दुपारनंतर अनुकूल काळ आहे. बौद्धिक दृष्ट्या लेखन कार्यात सक्रीय भाग घ्याल. परदेशस्य स्नेह्यांकडून येणार्या वार्ता मनाला आनंद देतील. व्यवसायात जपून राहा. अधिकारी वर्गाशी चर्चा आणि वादविवाद टाळा.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य शनिवार दि.१५ मार्च २०२५
- पत्नीला सर्व सुखसुविधा मिळाव्यात म्हणून पती कामानिमित्त घराबाहेर, प्रियकर पत्नी जवळ घरी, एक दिवस डाव साधला अन् केला मोठा कांड!
- ३६ वर्षीय महिलेचे १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर प्रेम जडले अन् एके दिवशी त्यास फूस लावून पळवून नेले; चार महिन्यानंतर एका पोस्टने पितळ पडले उघडे.
- मालेगावात एका बहाद्दराने जिवंत असतांना बनविला मृत्यूचा दाखला; काय आहे प्रकरण सत्य ऐकून हैराण व्हाल.
- बोदवड जवळ ट्रक चालकाचे लोकेशन चुकल्याने बंद फाटक तोडून ट्रक रेल्वेमार्गावर आलेल्या मुंबई- अमरावती एक्स्प्रेसची धडक, सुदैवाने मोठी हानी टळली.