भारतातील अनेक शक्तीपीठांपैकी मनःशक्तीपीठ म्हणजे श्री मनुदेवी अभयवचन नंतरचं प्रकटली आई सप्तश्रॄंगी व राक्षसांचा केला वध.

Spread the love

यावल : भारतातील अनेक शक्तीपीठांपैकी मनःशक्तीपीठ म्हणजे श्री मनुदेवी असा लौकीत सातपुडा निवासीनीचा आहे. ब्रम्हा,विष्णु,महेशा यांनी म्हैषासूर राक्षसाच्या धुमाकुळाने त्रस्त होत सातपुडयाच्या खोल दरीत गुहेत येऊन (आताचे मनुदेवी मंदिर) जप केला व सर्व शक्तीची प्रार्थना एकून श्री मनुदेवी देवांना प्रकट होत अभयवचन दिले की, मी लवकरच श्री सप्तश्रॄंग देवीचा अवतार घेऊन, येथूनच धावत जाऊन त्या महिषासुर राक्षसाचा वध करेल व त्या नुसार आई सप्तश्रॄंगी प्रकटली अशी दंत व पौराणीक कथेत उल्लेख आहे म्हणुन मन शांत करण्या करीता भाविक,भक्त सातपुड्याच्या निर्सगरम्य वातावरणात दर्शना करीता येतात.

या तिर्थक्षेत्राविषयी अनेक दंतकथा, लोककथा, तोंडी इतिहास आहे. देवी भागवत पुराणात असा उल्लेख आहे कि विष्णु ब्रम्हा महेश या देवांवर एक मोठे संकट आले असता, राक्षसांपासून सुटका करण्यासाठी या तिन्ही देवतांना गुप्त ठिकाणी म्हणजे सातपुडयाच्या खोल दरीत गुहेत येऊन बसले. ते गुप्त ठिकाण म्हणजे श्री मनुदेवीचे मंदिर होय. सर्व देवांनी मनाने एक विचार करीत असता, लपलेल्या गुहेत श्वासाने उच्छवासाने एक तेज प्रकट झाले. ती तीव्र तेजस्वी प्रकाशाची ज्योत निर्माण झाली, तो सर्व शक्तीमान प्रकाशाचे देवता मनाचे सामर्थ्य असलेली श्री मनुदेवी प्रकट झाली.

तीच मनुदेवी देवांजवळ प्रकट झाल्याने, कोणत्या हेतूने आपण आला आहात, त्यावेळी ब्रम्हा विष्णु महेशांनी देवीस विनंती केली की, हे आदिशक्ती, सर्वमान शक्ती श्री मनुदेवी आमच्यावर फार मोठे संकट कोसळलेले आहे. म्हैषासूर राक्षसाने पॄथ्वीवर सर्वत्र धुमाकूळ, अत्याचार सुरु केल्याने आम्हाला हैराण त्रस्त केलेले आहे. म्हणून त्याचा वध करण्यासाठी तू उग्र रूप धारण करुन त्याचा नि:पात करावा. त्यास नष्ट करावे व सर्व जीव सॄष्टीला भय मूक्त करावे. ही सर्व शक्तीची प्रार्थना एकून श्रीमनुदेवी देवांना अभयवचन दिले की, मी लवकरच श्री सप्तश्रॄंग देवीचा अवतार घेऊन, येथूनच धावत जाऊन त्या महिषासुर राक्षसाचा वध करेल.

या अभिवचनानुसार श्रीमनुदेवी ही महिषासुर सैन्याचा वध करीत तापी काठावर वसलेले शिरागड येथे युध्द केले. म्हणून त्या ठिकाणी श्रीमनुदेवीचे स्वरूप शिरागडची अष्टभुजा देवी म्हणून आजही विराजमान आहे. तेथून श्रीमनुदेवीने नांद्रा ( बाजारा ) येथे युध्द केले तेथे ही अष्टभुजादेवीचे मंदिर आहे. नांद्रा येथून पाटणा या ठिकाणी घनघोर युध्द झाल्याने देवीने तेथे विश्रांती घेतलेली आहे. म्हणून श्री पाटणा देवी येथे श्री श्रीमनुदेवीचे स्वरुप अष्टभुजा देवीच्या सुंदर स्वरुपात प्रकट झालेली असून जागॄत ठिकाण झालेले आहे.

तेथूनच श्री मनुदेवीने महिषासुर राक्षसाचा वध सप्तश्रॄंग पर्वतात केल्याने दुर्गम अशा ठिकाणी श्री सप्तश्रॄंग देवीने उग्र स्वरूप धारन करून त्या महाभयंकर राक्षस महिषासुराचा सतत ७ वर्षे घनघोर युध्द करून त्यास नष्ट केलेले आहे. तीच आदिशक्ती म्हणजे श्री सप्तश्रॄंगदेवीचे माहेर हे खानदेश म्हणून सांगतात म्हणजेच सातपुडा निवासिनी श्री मनुदेवीचे स्वरूप होय. अशी ऐकिवात येणारी कथा आहे.

असे आहे मंदिर.
मंदिराच्या तिन्ही बाजूस उंच कडे असून मंदिराच्या समोर अंदाजे 400 फूट उंचीवरुन कोसळणारा धबधबा आहे. वर्षातील ६ ते ७ महिने कोसळणारया या धबधब्याचे पाणी सातपुड्याच्या पायथ्याशी येते. येथे शासनाच्या मदतीने पाझर तलाव बांधण्यात आहे. तलावाशेजारीच छोटेशे सुंदर हनुमानाचे मंदिर आहे. त्यामुळे मनुदेवीचा परिसर रमणीय व मनमोहक असा झाला आहे.

टीम झुंजार