बाजारपेठ पोलिसांनी तीन गावठी पिस्तुल, जिवंत काडतुससह गुन्हा करून फरार झालेल्या तिघांना ठोकल्या बेड्या, मुख्य आरोपी फरार!

Spread the love

भुसावळ: – गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीचा पाठलाग करत बाजारपेठ पोलिसांनी त्याच्या सोबतच्या तिघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे व जीवंत काडतुसांसह अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे. तर, आधीपासून फरार असल्याने पोबारा केला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील खडका गावातील रहिवासी गिरीश देविदास तायडे याच्या विरोधात बाजारपेठ पोलीस स्थानकात गुरनं ४३०/२०२३ अन्वये भादंवि कलम ३७९, १८६, ५०४, ५०६, ३४ तसेच जमीन महसूल अधिनियम ४८ (७); ४८ (८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तो तेव्हापासूनच फरार आहे. बाजारपेठ पोलीस त्याच्या शोधात होते. दरम्यान, बाजारपेठचे पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांना गुप्त माहिती मिळाली की, गिरीश तायडे हा आपल्या साथीदारांसह खडका चौफुलीवर येणार असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील आहे.

या अनुषंगाने, पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांनी सपोनि हरिष भोये, मंगेश जाधव, सुनिल जोशी, वजय नेरकर,रमन सुरळकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, निलेश चौधरी, उमाकांत पाटील, सचिन चोधरी, जावेद शहा, प्रशांत परदेशी, योगेश माळी यांचे पथक तयार केले. या पथकाने खडका चौफुली येथे सापळा लावला असता, गिरीश तायडे हा एमएच १९ डीव्ही २३३३ क्रमांकाच्या पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून आला. सदर वाहनाचे चालकाने पोलीसांना पाहताच तो भरधाव वेगात खडका गावाच्या दिशेने पळाला. पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग केला असता ते खडका गावाच्या शिवारात आरोपी गिरीश देवीदास तायडे याचे ढाब्यावर वाहन उभे करून यातील संशयित हे पलायन करण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी त्यांना पकडले.

यात धिरज प्रकाश सोनवणे, वय ३९ वर्षे, रा. पाण्याचे ‘टाकोजवळ, खडका गाव, मुकेश जयदेव लोढवाल, वय २३ वर्षे, रा. ज्ञानज्योती शाळेजवळ, बिंदीया नगर, खडका गाव, आणि संजय शांताराम कोळी, वय ३९ वर्षे, पाण्याचे टाकीजवळ, खडका यांना अटक करण्यात आली. दरम्यान, या धावपळीत गिरीष देवीदास तायडे ( वय ३९ वर्षे, रा. खडका गाव, ता. भुसावळ ) याने मात्र पलायन करण्यात यश मिळवले. त्यानंतर पोलीस पथकाने मिळुन संंशयीतांची अंगझडती घेवुन संशयीत वाहन आणि सदर ठिकाणीवरील रूम चेक केले असता-त्यांच्याकडे तीन गावठी पिस्तुल; दोन जिवंत काडतुस; पिस्टल मधील ०२ काडतुस (बुलेट); एक लोखंडी कोयता आणि तीन मोबाईल फोन व सहा फायबरचे रॉड या बाबी आढळून आला.

या अनुषंगाने वर नमूद केलेल्या चारही जणांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. गु.र.क्र. ५०१/२०२३, आर्म अँक्ट ३/२५, ४/२५ सह मपोका कलम ३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन नमुद गुन्हयाचा तपास पोउनि मंगेश जाधव करित आहेत. या गुन्हयात आरोपी नाम धिरज प्रकाश सोनवणे, मुकेश जयदेव लोढवाल, व संजय शांताराम कोळी यांना अटक करण्यात आली असुन त्यांना १७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक एस.,ऱाजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहा.पो.निरी. हरोष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ/सुनिल जोशी, पोहेकॉ/विजय नेरकर, पोहेकॉ/रमण सुरळकर, पोहेकॉ/यासीन पिंजारो, पोहेकॉ/महेश चौधरी, पोहेकॉ/निलेश चौधरी, पोहेका/उमाकांतं पाटील, पोकॉ/सचिन चौधरी, पोकॉ/ जावेद शहा, पोकॉ/प्रशांत परदेशी, पोकॉ/योगेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार