नवी दिल्ली:- कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली आणि आंध्र प्रदेशमधील 55 हून अधिक ठिकाणी कंत्राटदार आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर सुरू असलेल्या छाप्यांमध्ये आयकर विभागाने तब्बल 94 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, या छापेमारीत 94 कोटी रुपये रोख, 8 कोटी रुपयांचं सोनं आणि हिऱ्यांचे दागिने आणि 30 लक्झरी घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. 12 ऑक्टोबर रोजी शोध सुरू करण्यात आला आणि या काळात विभागाने बंगळुरू आणि शेजारच्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही शहरं तसेच दिल्लीतील 55 परिसरांवर छापे टाकले.
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (एसबीडीटी) एका निवेदनात म्हटले आहे की, “यामध्ये 94 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, जे एकूण 102 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत.” CBDT ने सांगितलं की, एका खासगी पगारदार कर्मचाऱ्याच्या आवारातून 30 लक्झरी विदेशी घड्याळांचं कलेक्शन जप्त करण्यात आलं आहे.”

“बेहिशेबी” रोख जप्त झाल्यानंतर, या मुद्द्यावरून कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भाजपा यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कतील म्हणाले की, हा पैसा काँग्रेसशी संबंधित आहे. याच दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा आरोप निराधार असल्याचं म्हटले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






