वैशाली (बिहार) :- अवैध दारू विक्रेत्याच्या मालमत्तेवर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला दारूऐवजी तब्बल 30 गोण्यांमध्ये भरून ठेवलेले पैसे मिळाले. बिहार राज्यातल्या वैशाली जिल्ह्यात हा प्रकार घडला. पोलिसांनी पैशांच्या सर्व गोण्या जप्त केल्या असून त्या पोलीस ठाण्यात आणल्या आहेत. सुकुमारपूर दियारा भागात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुकुमारपूर हे दारूविक्रेत्यांसाठी सुरक्षित क्षेत्र असल्याचं सांगितलं जातं. वैशाली जिल्ह्यात ठिकठिकाणी दारू तयार केल्यानंतर ती तिथून इतर पाठवली जाते. सुकुमारपूरहून पाटणा भागातही दारू पाठवली जाते, असं स्थानिक नागरिक सांगतात.
नुकताच रुस्तमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दारू व्यावसायिकाने प्रॉडक्शन टीमवर हल्ला केला होता. त्यामुळे रुस्तमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या सुकुमारपूर भागात अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली व या भागात पोलिसांचं पथक छापा टाकण्यासाठी गेलं,’अमर उजाला’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. परंतु पोलिसांचा छापा पडणार याची कुणकुण लागताच अवैध दारू विक्री करणारे आरोपी पसार झाले. पोलिसांचं पथक जेव्हा आरोपीच्या घरी गेले, तेव्हा त्यांना तिथे दारू सापडली नाही; मात्र घराची झडती घेत असताना

पोलिसांना पैशांनी भरलेल्या तब्बल 30 गोण्या मिळाल्या.
30 गोण्यांमध्ये भरलेल्या नोटा आणि नाणी बेनामी असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्या गोण्या जप्त केल्या. तसंच त्या गोण्यांमध्ये नेमका किती पैसा आहे, हे मोजण्यास सुरुवात केली; मात्रतब्बल सहा तासांमध्येही सर्व गोण्यांतले पैसे मोजून झाले नव्हते. पोलिसांकडे आयकर किंवा अंमलबजावणी संचालनालय विभागासारखी पैसे मोजण्यासाठी तांत्रिक यंत्रणा नसल्यामुळे पैसे मोजण्यास वेळ लागला.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या घराची झडती घेतली असता दारूऐवजी पैशांनी भरलेल्या 30 गोण्या सापडल्या. पोलिसांनी या गोण्या ताब्यात घेऊन रुस्तमपूर पोलीस ठाण्यात आणल्या. त्यानंतर सुमारे 50 पोलीस पैसे मोजण्यात व्यग्र होते. तब्बल 6 तासांपेक्षा जास्त काळ होऊनही पैशाची मोजणी पूर्ण झाली नाही. पोलिसांच्या या कारवाईने दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस अधिकारी बनेश्वर टिस्को यांनी सांगितलं, की ‘अवैध देशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानं आम्ही सुकुमारपूर डायरा इथे छापा टाकण्यासाठी गेलो होतो. छाप्यादरम्यान दारू व्यावसायिकाकडून गोण्यांमध्ये ठेवलेली रक्कम जप्त करण्यात आली.’ दरम्यान, या घटनेची वैशाली जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






