जामनेर तालुका आरोग्य विभागाचे काम समाधानकारक, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हाधिकारी यांची भेट

Spread the love

जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित यांनी भेट दिली.यावेळी तालुक्यातील आरोग्य विभागाचे काम त्यांनी समाधानकारक असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तपासणी दरम्यान प्रसुती गृह,ऑपरेशन थेटर,औषधी साठवण कक्ष,लस साठा याची सखोल तपासणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी येथे सुरू असलेल्या आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड कँपला जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन

नागरिकांशी हितगुज साधले व जिल्हाधिकारी यांनीं स्वतः आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्याची प्रकिया पूर्ण केली.जामनेर तालुका आरोग्य विभागाचे गोल्डन कार्ड कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.सदर कॅम्प मध्ये शंभर कार्ड काढण्यात आले.जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी कामकाज सुधारण्याबाबत महत्वाचे मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी तहसीलदार नानासाहेब आगळे,जामनेर नगर परिषदचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले,सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत,डॉ.सागर पाटील यांनी मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत केले.

सदर प्रसंगी औषध निर्माण अधिकारी अतुल पाटील, आरोग्य सहाय्यक गोपाळ पाटील,व्ही.एच.माळी,
रवींद्र सूर्यवंशी आरोग्य सहाय्यिका सुरेखा गोसावी, शोभा घाटे,आरोग्य सेवक सुनील बोरसे, स्वप्नील महाजन,हेमंत पाटील,अनंत गंगतिरे,विनोद पाटील,धीरज पाटील,अनिल सोनवणे,आरोग्य सेविका मनीषा पवार,गटप्रवर्तक ज्योती पाटील,मीनाक्षी बिंदवाल,पुजाबाई रबरे, रोहित गोयर, चरण चव्हाण,जावेद तडवी,सांडु गोंधळी, अंगणवाडी सेविका संघमित्रा इंगळे, ज्योती औटी,लता राजपूत, इंदूबाई वाणी, छाया सुरवाडे,राधा राजपूत,शकुन्तला औटी उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार