VIDEO : सोशल मीडियावर लोक नेहमीच काही ना काही विचित्र गोष्टी करताना दिसतात. यातील बहुतेक व्हिडिओ हे स्टंटशी संबंधित असतात. रस्त्यात, विहिरीत, डोंगराच्या वाटेवर बाईक घेऊन स्टंट करताना तुम्ही अनेकांना पाहिलं असेल, पण तुम्ही कधी एखाद्याला नदीत बाईक चालवताना पाहिलं आहे का?
तुम्हाला जर असं वाटत असेल की हे फक्त कल्पनेतच घडू शकतं, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण एका व्यक्तीने जुगाडमधून दमदार बाईक बनवली आहे. जी पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
भारतीय लोक खूप जुगाडू आहेत. ते त्यांच्या गरजेनुसार वस्तू बनवतात. आता हा व्हिडिओच बघा, ज्यात एका व्यक्तीने जुगाडच्या माध्यमातून पाण्यात आरामात धावू शकणारी बाईक बनवली आहे. यात आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीने कोणत्याही आधुनिक तंत्राची मदत घेतली नसून अगदी निरुपयोगी वस्तूंच्या वापरातून हा चमत्कार घडवून आणला आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण चार बॅलर आपल्या बाइकला जोडतो आणि नंतर अतिशय मजेत तो पाण्यावर आपली बाइक चालवताना दिसत आहे. एवढंच नाही तर तो मध्येच हँडलवरील हात सोडून नदीच्या मधोमध पाण्यात स्टंट करताना दिसत आहे. मात्र, हे पाहून एक गोष्ट जाणवते की, यामध्ये सुरक्षिततेची कोणतीही हमी नाही.

crackmind111 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहेपर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे आणि त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, केवळ लाइक्स आणि व्ह्यूजसाठी अशा गोष्टी करू नका. तर दुसर्याने लिहिलं, ‘जुगाड क्रिएटिव्ह आहे पण तो खूप धोकादायक आहे.’
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






