एरंडोल तालुक्यात भर दुपारी चोरी.दोन लाखाचा ऐवज लंपास.

Spread the love

एरंडोल- खर्ची बुद्रुक आणि रिंगणगाव (ता.एरंडोल) येथे मंगळवारी भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी भर दुपारी चोरी करून सुमारे दोन लाखाचा ऐवज लंपास केला.ग्रामीण भागात दुपारच्या वेळेस ग्रामीण भागातील ग्रामस्थ शेतात कामानिमित्त जात असून भर दुपारी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.खर्ची बुद्रुक येथील घटनेत लिलाधर प्रकाश मराठे हे सकाळी आठ वाजेच्या सुमारास पत्नी वैशाली मराठे यांचेसह त्यांच्या जटाकीर बाबा रस्त्यावरील शेतात कामासाठी गेले होते.सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा तेजस याने घराला कुलम लाऊन नेहमीच्या ठिकाणी चाबी ठेवून बाहेर गेला.

दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांचे वडील प्रकाश मराठे हे घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला.त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना घरातील कपाटातील सामान अस्तावस्त दिसले तसेच घरातील सोन्याचे दागिने असलेले बॉक्स उघडे दिसले.प्रकाश मराठे यांनी मुलगा लिलाधर मराठे यांना घटनेची माहिती दिल्यामुळे ते पत्नीसह शेतातून घरी आले.त्यावेळी त्यांना घराचे कुलूप व चाबी घराबाहेर पडलेली दिसली.त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता त्यांना कपाटात असलेले सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे चाळीस gram वजनाचे सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये रोख असा सुमारे १ लाख ४५ हजार रुपये ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले.

याबात लिलाधर मराठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुस-या घटनेत रिंगणगाव येथील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी चेतमउत्तम महाजन हे कामावर गेले होते.तर त्यांची पत्नी जयश्री, मुलगा प्रणय आणि आई सुनंदाबाई महाजन हे जळगाव येथे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नातेवाईक यांना पाहण्यासाठी गेले होते.दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास चेतन महाजन यांच्या पत्नी जयश्री ह्या मुलगा व सासू यांचेसह जळगाव येथूनरिंगणगाव येथे परत आल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला.

त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटाचा दरवाजा उघडा असून त्यामध्ये असलेले सोन्याचे दागिने आढळून आले नाही.कपाटात असलेले पाच हजार रुपये व सोन्याचे दागिने असा ५२ हजार सातशे रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरूननेला.याशिवाय घरातील अन्य वस्तू देखील चोरट्यांनी चोरून नेल्या.याबाबत चेतन महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार जुबेर खाटिक आणिचंद्रकांत पाटील तपास करीत आहेत.भर दुपारी चोरी झाल्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार