परिसरात गुन्हेगारी माजविणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार

Spread the love

जळगाव :- शहरातील अनेक परिसरात गुन्हेगारी माजविणाऱ्या टोळ्यांच्या सदस्यांना हद्दपार करण्याचा सपाटा सुरु असताना आज पुन्हा तीन सराईत गुन्हेगारांना २ वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानक व रामानंदनगर पोलीस हद्दीत दरोड्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक हत्यार बाळगणे, अशिल शिवीगाळ करणे, घातक हत्यार्याने दुखापत, दमबाजी करणे असे एकूण ०८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्यापैकी पाच गुन्हे सदरील टोळीने केले आहे. यात हद्दपार प्रस्ताव क्र. ०४/२०२३ प्रमाणे १) स्वप्नील उर्फ गोलु धर्मराज ठाकुर वय १९ रा डीएन सी कॉलेज जवळ शंकर अप्पानगर जाळगांव (टोळी प्रमुख), (२) निशांत प्रताप चौधरी वय १९ रा डीएन सी कॉलेज जवळ शंकर अप्पानगर जळगांव (टोळी सदस्य), (३) कुणाल उर्फ दुंडया किरण कोळी वय १९ रा साईसिटी कुसूंबा ता जि जळगांव (टोळी सदस्य) यांचे विरुध्द एमआयडीसी पो.स्टे. रामानंदनगर पोलीस स्टेशनला दरोड्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक हत्यार बाळगणे, अशिल शिवीगाळ करणे, घातक हत्यार्याने दुखापत, दमबाजी करणे या सदराखाली एकूण ०८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्यापैकी पाच गुन्हे टोळीने केले सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी केलेली आहे. सदर सामनेवाले यांनी टोळीने राहुन जळगाव शहरात ठिक ठिकाणी दहशत पसरवितात. सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास धोका निर्माण झालेला आहे. त्यांना जळगाव जिल्हयांतील सार्वजनीक शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याबाबत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही.

त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल असुन त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. सदर टोळीची जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती तसेच ते नेहमी घातक हत्यार घेऊन फिरत असल्यामुळे त्यांच्या टोळीची पांगापांग व्हावी याकरिता सदरचा हद्दपार प्रस्ताव हा एमआयडीसी पो.स्टे. चे पो.निरी. श्री. जयपाल हिरे, सफी/अतुल वंजारी, पोना/सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर साळवे, साईनाथ मुंडे, मपोकॉ/ निलोफर सैययद यांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कडेस सादर केला होता.

हे पण वाचा

टीम झुंजार