पारोळा l प्रतिनिधी
येथील माजी नगरसेवक महेश उत्तमराव चौधरी वय ४७ यांचे आज सकाळी अज्ञात वाहनाने मागून दिलेल्या धडकेत दुःखद निधन झाले याबाबत असे की असे की आज सकाळी महेश चौधरी आपल्या खाजगी कामासाठी एरंडोल प्रांत ऑफिसमध्ये कामानिमित्ताने जाण्यासाठी निघाले असता सार्वे गावाजवळील जिओ पेट्रोल पंप जवळ सकाळी १०:३० वाजता पारोळा कडून एरंडोल कडे जात असताना पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने
बुलेट वाहन क्रमांक एम एच १९ सी एच १३११ या बुलेट गाडीचे मागच्या रिंगसह गाडीचे नुकसान झाले आहे नुकसान या धडकेत महेश चौधरी गंभीर जखमी झाले असता त्यांना परिसरातील लोकांनी एरंडोल रुग्णालयात दाखल केले परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलिसात अंकित महेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार इक्बाल शेख करीत आहेत.

दरम्यान महेश चौधरी यांनी पारोळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्षपदही भूषविले होते, ते पारोळा तेली समाज अध्यक्षपदी विराजमान होते कसोदा नाका येथील हॉटेल सावजी ते संचालक होते अत्यंत मनमिळावू हसतमुख व दिलखुलास व्यक्तिमत्त्व असलेले ते होते.त्यांच्या पश्चात आई,पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
कै महेश चौधरी यांच्या पवित्र आत्म्यास चिर शांती लाभो ही प्रार्थना. झुंजार न्यूज टीमच्या वतीने विनम्र अभिवादन
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम