कासोदा:- येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी झालेल्या विशेष सभेत पुरुषोत्तम भास्कर चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत मध्ये एकूण १७ सदस्य असून पुरुषोत्तम भास्कर चौधरी यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवड प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील उपस्थित होते .
माजी सरपंच महेश पांडे यांनी दिनांक २२/०९/२०२३ रोजी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. दिनांक ०४/१०/२०२३ रोजी जिल्हाधिकारी यांनी पडताळणी करून दिनांक २० रोजी नवीन निवडीचा आदेश दिला . दिनांक २० रोजी सकाळी १० वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया सुरू झाली .सरपंच पदासाठी पुरुषोत्तम चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे दुपारी दोन वाजता त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर झाली. त्यांच्या नावाची सूचना महेश पांडे यांनी मांडली. निवडणूक अधिकारी म्हणून आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी शिवाजीराव गुरुगुडे यांनी काम पाहिले.
त्यांना ग्रामविकास अधिकारी पी आर चव्हाण यांनी व सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले. सदर निवड प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, माजी सरपंच महेश पांडे,सदस्य स्वप्निल बियाणी , नरेश ठाकरे, संजय चौधरी, दगडू चौधरी इत्यादींसह सर्व १७ ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडीनंतर सरपंच पुरुषोत्तम चौधरी यांचे उपस्थितांनी , मित्रमंडळींनी, पत्रकारांनी अभिनंदन केले. गुलाल उधळत, फटाके फोडत ,ढोल ताशाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. अनेकांनी त्यांचे औक्षण केले.
कासोदा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुरुषोत्तम भास्कर चौधरी यांची निवड झाल्याबद्दल झुंजार न्यूज टीमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






