Viral Video: शाळा म्हणजे विद्यार्थ्यांची जडण घडण होण्याचे सर्वांगिण विकास अन् उज्वल भविष्य घडवण्याचे ठिकाण. मात्र या विद्येच्या मंदिरातच मुलांना शिक्षकांकडून मारहाण होत असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. उत्तरप्रदेशमधून असाच एक संतापजनक प्रकार समोर आला असून शिक्षिकने आपल्या विद्यार्थिनीला केस धरुन मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली कोणतीही घटना अगदी काही क्षणांत सर्वांपर्यंत पोहोचते.
सध्या उत्तरप्रदेशमधील एका शाळेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये एक शिक्षिका आपल्या विद्यार्थिनाला अत्यंत अमानुषपणे मारहाण करत आहे. उत्तरप्रदेशच्या सुल्तानपुरमधील हा संपूर्ण प्रकार असल्याचे सांगण्यात येत असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. विद्येच्या मंदिरात मुलांना अशी क्रुर वागणुक देणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई झाली पाहिजे, असेही नेटकऱ्यांनी म्हणले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या विद्यार्थिनीने शिक्षिका शिकवत नसल्याची तक्रार केली होती. याच रागातून शिक्षिकेने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली. व्हिडिओमध्ये शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी जमा झालेले दिसत आहेत. सर्वांसमोर शिक्षिका एका लहान मुलीला मारहाण करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षिका मुलीचे केस पकडून तिला गरगर गोल फिरवत आहे. मी शिकवत नाही का? असे म्हणत ही शिक्षिका चिमुकलीला मारहाण करत आहे.

हा संपूर्ण प्रकार पाहून इतर विद्यार्थीही चांगलेच घाबरुन गेल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही जणांनी या शिक्षिकेला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र जाब विचारायला गेलेल्या तरुणांशीही तिने हुज्जत घातली. इतकेच नव्हेतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाच्याही अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न या शिक्षिकेने केला. हे दोन्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून शिक्षिकेच्या अटकेची मागणी केली जात आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






